सांगलीमधील आणखी सात पोलीस निलंबित; अटकेतील पोलिसांचे तपासात असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 06:21 AM2017-11-12T06:21:00+5:302017-11-12T06:21:00+5:30

‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी, सांगली शहर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह आणखी सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सांगली जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.

Seven more policemen suspended in Sangli; Incompetent police investigation | सांगलीमधील आणखी सात पोलीस निलंबित; अटकेतील पोलिसांचे तपासात असहकार्य

सांगलीमधील आणखी सात पोलीस निलंबित; अटकेतील पोलिसांचे तपासात असहकार्य

Next

सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी, सांगली शहर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह आणखी सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सांगली जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.
निलंबित ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, पोलीस कोठडीचे गार्डप्रमुख प्रदीप रामचंद्र जाधव, श्रीकांत सुरेश बुलबुले, ज्योती चंद्रकांत वाजे, स्वरूपा संतोष पाटील, वायरलेस आॅपरेटर सुभद्रा विठ्ठल साबळे व गजानन जगन्नाथ व्हावळ यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत.

बॅग व्यापा-याकडे चौकशी
अनिकेत हा बॅग व्यापारी नीलेश खत्री याच्याकडे कामाला होता. खत्रीने कामटेमार्फत त्याचा ‘काटा’ काढल्याचा आरोप कोथळे कुटुंबाने केला होता. शनिवारी सीआयडीने खत्री याची तासभर चौकशी केली.

अश्लील ‘सीडी’चा तपास करणार
लकी बॅग्ज दुकानात महिलांचे अश्लील चित्रीकरण केले जात होते. त्याची सीडी बनविण्यात येत होती. अनिकेतला त्याची माहिती मिळाली होती. त्यातून युवराज कामटे यास सुपारी देऊन अनिकेतचा खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्याचाही सीआयडी तपास करणार आहे.

‘थर्ड डिग्री’चा वापर करून बेदम मारहाण
आतापर्यंत या प्रकरणात १२ पोलीस निलंबित झाले आहेत. कवलापूर (ता. मिरज)
येथील संतोष गायकवाड यांना लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना सोमवारी अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व ‘झीरो’ पोलीस झाकीर पट्टेवाले यांनी ‘थर्ड डिग्री’चा वापर करून, अनिकेतला बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला.


अनिकेत कोथळे मृत्युप्रकरणी आतापर्यंत १२ पोलिसांवर कारवाई केली आहे. गरज पडल्यास सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही भूमिका तपासली जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल.
- दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री

Web Title: Seven more policemen suspended in Sangli; Incompetent police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस