सात नक्षली ठार, गडचिरोलीत चकमक, सर्वात मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:59 AM2017-12-07T04:59:56+5:302017-12-07T05:00:07+5:30

सिरोंचा तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात बुधवारी पहाटे चकमकीत पोलिसांंनी ७ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. त्यात ५ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे.

Seven naxalites killed, Gadchiroli flicker, biggest action | सात नक्षली ठार, गडचिरोलीत चकमक, सर्वात मोठी कारवाई

सात नक्षली ठार, गडचिरोलीत चकमक, सर्वात मोठी कारवाई

Next

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात बुधवारी पहाटे चकमकीत पोलिसांंनी ७ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. त्यात ५ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. लाखोंची बक्षिसे लावलेल्या म्होरक्यांचा खात्मा झाल्याने, नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
नक्षलवाद्यांच्या शिबिराची माहिती मिळताच, पोलिसांच्या पथकाने पहाटे कारवाई सुरू केली. पोलिसांची कुणकूण लागताच, नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला, पण पोलीस भारी पडले. या वर्षी मंगळवारपर्यंत वेगवेगळ्या कारवाईत ९ नक्षलींना पोलिसांनी ठार केले. आजच्या कारवाईत पोलिसांना मोठेचे यश मिळाले.
अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांना कारवाया करता आल्या नाहीत. नक्षलींचा २ डिसेंबरपासून सप्ताह सुरू आहे. त्या आधी नक्षलींनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून ५ जणांची हत्या केली होती. कोटगूलच्या भूसुरुंग स्फोटात हवालदार सुरेश गावडे व टव्वेच्या चकमकीत सीआरपीएफ जवान मंजूनाथ शिवलिंगपा शहीद झाले होते.

सहा मृत नक्षलवाद्यांची ओळख पटली
७ पैकी ६ नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. मयत आयतू उर्फ अशोक कंगा पेंदाम हा अहेरी दलम कमांडर म्हणून काम करीत होता. त्याच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते. सिरोंचा दलम सदस्य सरितावर २ लाखांचे, एसीएम पदावर असलेल्या चंदूवर सहा लाखांचे, तर पेरमिली दलम सदस्य शैलावर २ लाखांचे बक्षीस होते. चार लाखांचे बक्षीस असलेल्या अखिला कुळमेथे व सिरोंचा दलमची एसीएम सुनीता कोडापे हिच्यावरही ६ लाखांचे बक्षीस होते.

दारूगोळा, नक्षली साहित्य जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन एसएलआर, दोन ८ एमएम रायफल, दोन १२ बोअर रायफल, एक १२ बोअर कट्टा यांच्यासह दारूगोळा, नक्षलवाद्यांची पत्रके व इतर नक्षल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले. दुपारी सर्वांचे मृतदेह अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात आणल्यानंतर, तेथून हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. पोलिसांची झिंगानूर परिसरातील
जंगलाच्या भागात शोधमोहीम सुरूच होती.

Web Title: Seven naxalites killed, Gadchiroli flicker, biggest action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.