धुळ्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू
By Admin | Published: November 2, 2016 04:52 AM2016-11-02T04:52:21+5:302016-11-02T04:52:21+5:30
जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांमध्ये गेल्या दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला.
धुळे : जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांमध्ये गेल्या दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला. यापैकी चौघांचा बुडून, तर तिघांचा रस्ते अपघात मृत्यू झाला.
गरताड येथे संजय गुलाबराव पाटील (४५) यांचा सोमवारी सकाळी नऊ वाजता शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला़ दुसऱ्या घटनेत सुरेंद्र तुकाराम निकम (३५ रा़ बेंद्रेपाडा ता़ धुळे) हे सोमवारी दुपारी शेतातील पाइप जोडत असताना तोल जाऊन विहिरीत पडले़ तर विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने मयुर जितेंद्र पाटील (२३ रा़ वाडी ब्रुद्रूक ता़ शिरपूर) सोमवारी सकाळी विहिरीत पडला़ या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. तसेच शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे बॅरेजच्या गेट नं़ २१/२२ मध्ये पाण्यात बुडून किशार लोटन चौधरी (१८) या युवकाचा रविवारी मृत्यू झाला. पांझरा नदीवरील लहान पुलावर रिक्षाने धडक दिल्याने नरहर हरचंद सोनगीरे यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. तसेच सूरत-नागपूर महामार्गावर पिकअप व्हॅनने धुळ्याकडे येणाऱ्या दुचाकीलादिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सोना चिंधा ठेलारी (४०) यांचा मृत्यू झाला़ याच वेळी साक्री तालुक्यात वाहन उलटल्याने बिबा राध्या बिलकुडे (४५) हे ठार, तर १३ मजूर जखमी झाले. (प्रतिनिधी)