सात युद्धनौका, सहा पाणबुड्यांनी नौदल होणार सुसज्ज

By admin | Published: July 28, 2014 04:06 AM2014-07-28T04:06:21+5:302014-07-28T04:06:21+5:30

नौदलाला येत्या काळात आणखी सुसज्ज करण्यासाठी सात युद्धनौका आणि सहा पाणबुड्यांचा हातभार लागणार आहे.

Seven warships, equipped with six submarine naval ships | सात युद्धनौका, सहा पाणबुड्यांनी नौदल होणार सुसज्ज

सात युद्धनौका, सहा पाणबुड्यांनी नौदल होणार सुसज्ज

Next

मुंबई : नौदलाला येत्या काळात आणखी सुसज्ज करण्यासाठी सात युद्धनौका आणि सहा पाणबुड्यांचा हातभार लागणार आहे. या युद्धनौका आणि पाणबुड्यांवर माझगाव डॉकमध्ये काम सुरू असून, ब्राव्हो प्रकारातील चार युद्धनौका तयार केल्या जात आहेत. यातील एक युद्धनौका दोन वर्षांत येणार आहे तर सहा पाणबुड्या २०१६पर्यंत नौदलाच्या ताफ्यात आणण्याचा प्रयत्न असणार आहे.
नौदलाच्या ताफ्यात सध्या २०३ विविध प्रकारच्या युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. यामध्ये पारंपरिक युद्धनौका, पाणबुड्या, आण्विक, भूजलचर, विमानवाहू जहाज, युद्धनौकांना पेट्रोल पोहोचवणारी इत्यादींचा समावेश आहे. नौदल अशा विविध युद्धनौका आणि पाणबुड्यांनी सज्ज झालेले असतानाच येत्या काळात आणखी सात युद्धनौका आणि सहा पाणबुड्यांनी अधिक सुसज्ज होणार आहे. माझगाव डॉकमध्ये सात युद्धनौका आणि सहा पाणबुड्यांची बांधणी केली जात आहेत. ब्राव्हो प्रकारातील चार युद्धनौकांची बांधणी केली जाणार असून, यातील एक युद्धनौका दोन वर्षांत नौदलाच्या ताफ्यात येईल, असे नौदलातील सूत्रांनी सांगितले.
ब्राव्हो प्रकारातील युद्धनौका पहिल्यांदाच बनविल्या जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्कॉर्पेन’ प्रकारातील सहा पाणबुड्याही बनविल्या जाणार असून, या २०१६पर्यंत नौदलाला सुपुर्द करण्याचा प्रयत्न असणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Seven warships, equipped with six submarine naval ships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.