मुंबईत अवतरणार जगातील सात आश्चर्य, महापालिकेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 06:10 PM2017-12-01T18:10:58+5:302017-12-01T18:21:00+5:30

जगातील सात आश्चर्यांविषयी कोणाला आकर्षण नाही? पण हे सात आश्यर्च प्रत्यक्षात बघणे सर्वसामान्यांसाठी दुर्लभचं. मुंबईकरांना मात्र लवकरच या सात आश्चर्यांची प्रतीकृती पाहता येणार आहेत. दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील 'जोसेफ बाप्टीस्टा उद्यान' मध्ये जगातील सात आश्चर्यांची प्रतीकृती महापालिकेमार्फत उभारण्यात येणार आहे.

Seven Wonders of the World, Nuclear Power Project in Mumbai | मुंबईत अवतरणार जगातील सात आश्चर्य, महापालिकेचा उपक्रम

मुंबईत अवतरणार जगातील सात आश्चर्य, महापालिकेचा उपक्रम

googlenewsNext

मुंबई: जगातील सात आश्चर्यांविषयी कोणाला आकर्षण नाही? पण हे सात आश्यर्च प्रत्यक्षात बघणे सर्वसामान्यांसाठी दुर्लभचं. मुंबईकरांना मात्र लवकरच या सात आश्चर्यांची प्रतीकृती पाहता येणार आहेत. दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील 'जोसेफ बाप्टीस्टा उद्यान' मध्ये जगातील सात आश्चर्यांची प्रतीकृती मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात येणार आहे.

डॉकयार्ड रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या महापालिकेच्या या उद्यानातून दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येत असतात. समुद्रसपाटीपासून सुमारे शंभर फुटांपेक्षा अधिक उंच असणा-या टेकडीच्या माथ्यावर पाच लाख ४४ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात हे उद्यान पसरलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक असणा-या या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची फळझाडे, फुलझाडे, वेली आहेत. 

या उद्यानातीन छोटा कृत्रिम धबधबा आतापर्यंत पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरत होता. मात्र यापुढे येथे उभ्या राहिलेल्या जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतीही पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरणार आहेत. यासाठी पालिकेला दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, मे २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज पालिकेच्या उद्यान कक्षाच्या कार्यकारी अभियंत्यांनी व्यक्त केला आहे. 

या सात आश्चर्यांची प्रतीकृती

  • ब्राझिलमधील रिओ शहरातील येशू ख्रिस्तांचा पुतळा
  • इटलीमधील पिसा शहरातील कलता मनोरा 
  • अमरिकेतील न्यूयॉर्क शहरातील स्वातंत्र्य देवतेचे पुतळा 
  • कमानकला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक श्रेष्ठ उदाहरण मानल्या जाणा-या इटलीतील रोम शहरातील कलोसियम या खुल्या सभागृहाचा समावेश आहे. 
  • फ्रान्समधील पॅरीस शहरातील आयफेल टॉवर * पुरातन संस्कृतीशी नाते सांगणारा मेक्सिको देशातल्या टिनम शहरातील चिनचेन इत्झा पिरॅमिड 
  • भारतातील आग्रा शहरातील ताजमहलची प्रतीकृती उभारण्यात येणार आहे.

प्रतिकृतीतून होणार सत्याचा भास-

सात आश्यर्चांच्या प्रत्येक प्रतिकृतीजवळ संबंधित मूळ ठिकाणाची माहिती व वैशिष्ट्ये सांगणारे फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रतिकृतींच्या सभोवताली रंग बदलणारे एल.ई.डी. दिवे बसविण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे संध्याकाळी व रात्री या प्रतिकृतींचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. 

Web Title: Seven Wonders of the World, Nuclear Power Project in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.