खूनप्रकरणी सात वर्षांची सक्तमजुरी
By admin | Published: October 13, 2014 01:15 PM2014-10-13T13:15:54+5:302014-10-13T13:20:00+5:30
क्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी येथे मुलावर होत असलेल्या खुनीहल्ल्यात मध्ये आल्याने वडिलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी हाजीमलंग महताब नदाफला वर्षांची सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी येथे मुलावर होत असलेल्या खुनीहल्ल्यात मध्ये आल्याने जखमी होऊन वडिलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी हाजीमलंग महताब नदाफ (वय ३५) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनकुमार देवरे यांनी ७ वर्षांची सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तर दोघांना आरोपातून मुक्त केले.
महिबूब हुसेनबाशा पटेल (वय ३0), हाजीमलंग महताब नदाफ (वय ३५), महताब अन्सार नदाफ (वय ५५, सर्व रा. पिंजारवाडी, ता. दक्षिण सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, महिबूब पटेल यांनी लाडलेमशाक शेख यांच्याकडे त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र लाडलेमशाक शेख यांनी हा प्रस्ताव नाकारून, त्यांनी आपल्या मुलीचा विवाह दुसरीकडे लावून दिला. त्यानंतर त्यांच्याच जमिनीवर वीटभट्टी सुरू करण्यास हरकत घेतली. यामध्ये फिर्यादी सैपन इस्माईल पटेल (वय २८, रा. पिंजारवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांचाही हात असल्याचा समज करून घेतला. दि.११ ऑगस्ट २0१३ रोजी हाजीमलंग नदाफ, महताब नदाफ यांनी सैपन शेख यांचे सासरे लाडलेमशाक शेख यांच्या घरी गेले. त्यावेळी तेथील शाहीन शेख हिला दमदाटी केली. ती घाबरून सैपन शेख यांच्या घरी पळत गेली असता महिबूब पटेल व महताब नदाफ यांनी तिचा पाठलाग केला. त्यावेळी सैपन शेख यांच्या घरी त्यांचे वडील उपस्थित होते. दोघांनी सैपन शेख यांना मारहाण करण्यास सुरूवात केली, त्यात हाजीमलंग नदाफ याच्या हातामध्ये गुप्ती होती तर महिबूब पटेल व महताब नदाफ हे दोघे चिथावणी देत होते. त्यावेळी हाजीमलंग नदाफ याने हातातील गुप्तीने सैपन शेख याच्यावर वार करण्यासाठी गेला असता त्यांचे वडील इस्माईल शेख मध्ये आले. त्यामुळे गुप्ती त्यांच्या छातीत बसली आणि ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. या मृत्यूस हाजीमलंग हा एकटाच जबाबदार असल्याने त्याला सदोष मनुष्यवधाखाली दोषी धरून शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारतर्फे अँड. आनंद कुडरूकर, मूळ फिर्यादीतर्फे अँड. धनंजय माने तर आरोपीतर्फे अँड. डी.ए.मुल्ला यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)