मटक्याच्या मुख्य अड्ड्यावर सतरा बुकींना अटक

By admin | Published: January 14, 2017 07:35 PM2017-01-14T19:35:05+5:302017-01-14T19:35:05+5:30

शहरातील कृष्णा कॅनॉल परिसरातील मटक्याचा मुख्य अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी मटका खेळणा-या तब्बल 17 बुकींना अटक करण्यात आली.

Seventeen bookies arrested on the main staircase | मटक्याच्या मुख्य अड्ड्यावर सतरा बुकींना अटक

मटक्याच्या मुख्य अड्ड्यावर सतरा बुकींना अटक

Next
style="text-align: justify;">ऑनलाईन लोकमत 
क-हाड, दि. 14 -  शहरातील कृष्णा कॅनॉल परिसरातील मटक्याचा मुख्य अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी मटका खेळणा-या तब्बल 17 बुकींना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. 
 
सुनील वासुदेव बेलवणकर (वय ४६, रा. शुक्रवार पेठ, कºहाड), नदीम खालिद बागवान (२३, रा. भाजीमंडई, कºहाड), अय्याज शब्बीर शेख (२८, रा. नारायणवाडी, ता. कºहाड), राहुल शामराव पाटील (३७, रा. मंगळवार पेठ, कºहाड), जुबेर यासीन पटेल (२८, रा. मंगळवार पेठ, कºहाड), तात्यासाहेब हणमंत सावंत (३१, रा. खोडशी, ता. कºहाड), जावेद अस्लम पठाण (३२, रा. मंगळवार पेठ, कºहाड), युनूस महंमद तांबोळी (४८, रा. गुरुवार पेठ, कºहाड), विशाल हणमंत सावंत (२७, रा. खोडशी), असद युसूफ पठाण (२१, दौलत कॉलनी, कºहाड), मोईन अल्ताफ पठाण (२१, रा. मंगळवार पेठ, कºहाड), मोहनकुमार बाळकृष्णा बुराडे (४३, रा. शिवाजी स्टेडियममागे, शिक्षक कॉलनी, कºहाड), रणजित दिलीप मोरे (रा. मलकापूर), फिरोज याकुब शेख (३६, रा. मलकापूर), रमेश गजानन शिंदे (५२, रा. शनिवार पेठ, कºहाड), सुहेल सलीम पटेल (३३, रा. रुक्मिणी पार्क, कºहाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या मटका बुकींची नावे आहेत. 
 
क-हाडलगत कृष्णा कॅनॉलनजीक सैदापूर येथे शंकर कांतिलाल कणसे यांच्या मालकीची दुमजली इमारत आहे. या इमारतीत शहरासह परिसरातील मटका बुकी एकत्र येत असून, ती इमारत म्हणजे मटक्याचे मुख्य केंद्र आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला संबंधित इमारतीवर छापा टाकण्याचे आदेश दिले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उपअधीक्षक शिवणकर यांच्यासह पथक त्याठिकाणी पोहोचले. पथकाने इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी पंधरा ते वीस बुकी वेगवेगळ्या गोल टेबलवर बसून मटका घेत असल्याचे निदर्शनास आले.
 
पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. तसेच टेबलवर पडलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या, रोकड व इतर साहित्य हस्तगत केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. शहरानजीकच मटक्याचा हा मुख्य अड्डा असल्याने येथून दिवसाकाठी लाखोची उलाढाल होत असल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे. या कारवाईने मटका बुकींमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे. 
 
पोलिसांना पाहताच बुकी पळाले 
इमारतीच्या दुस-या मजल्यावर बुकींचा हा मटका अड्डा होता. पोलिस रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संबंधित इमारतीत पोहोचले. अचानक त्यांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहताच काही बुकींनी जिन्यातून खाली उड्या घेऊन तेथून धूम ठोकली. मात्र, इमारतीखाली थांबलेल्या पोलिसांनी त्या बुकींना पाठलाग करून पकडले.
 

Web Title: Seventeen bookies arrested on the main staircase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.