अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी कॉलेजच्या प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 06:31 PM2021-05-05T18:31:31+5:302021-05-05T18:31:51+5:30
Maharashtra Government News : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सरकार अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला आहे.
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सरकार अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना लाभ होणार आहे. या निर्णयासोबतच मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हे निर्णय पुढीलप्रमाणे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू.
(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग(
- सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापण्यास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
- महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देणार
(सार्वजनिक आरोग्य विभाग)
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरीत करण्याचा निर्णय.
(कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग )
- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीनीकरण
( नगरविकास विभाग)
कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा