सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा
By admin | Published: August 27, 2016 01:37 AM2016-08-27T01:37:41+5:302016-08-27T01:37:41+5:30
सांडपाणी शुद्ध केल्यास, शेती व अन्य कामासाठी पुनर्वापर झाल्यास आपल्याला भेडसावत असलेल्या जल समस्यांवर सहज मात करता येईल
पिंपरी : औद्योगिक वापरामुळे दूषित झालेले, तसेच नागरी वस्त्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी शुद्ध केल्यास, शेती व अन्य कामासाठी पुनर्वापर झाल्यास आपल्याला भेडसावत असलेल्या जल समस्यांवर सहज मात करता येईल, असे मत पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले संत बलबीर सिंग सिचेवाल यांनी व्यक्त केले आहे़ महाराष्ट्र विकास केंद्र, पुणे या सेवा संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़
समाजातील लोकसहभाग आणि राज्यकर्ते व प्रशासन यांच्याकडे इच्छाशक्ती असायला हवी़ निसर्गात उपलब्ध असलेल्या हवा, पाणी, जमीन, वनस्पती, आणि नैसर्गिक सामग्रीचा उपयोग व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले़ पंजाबमधील कालीबेन नदीचे पुनरुज्जीवन आणि तिचा १६५ किलोमीटर लांबीचा प्रवाह प्रदूषणमुक्त केला़ यामुळे सिचेवाल यांना जागतिक जलपरिषदेचे सदस्य डॉ़ मुस्तफ ा ताहेर अली सासा यांच्या हस्ते जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला़
या कार्यक्रमाला डॉ़ दि़ मा़ मोरे, राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, इंद्रजित देशमुख, अनिल
पाटील, राजेंद्र शेलार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
रघुनाथदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले़ तर प्रा. नेहा बोकील यांनी आभार मानले़(प्रतिनिधी)