उच्चभू्र वर्गातील ‘सेक्स रॅकेट’ उद्ध्वस्त

By admin | Published: December 13, 2015 01:45 AM2015-12-13T01:45:00+5:302015-12-13T01:45:00+5:30

अंधेरी-कुर्ला रोडवरील सहार परिसरातील असलेल्या एका गेस्ट हाउसमध्ये राजरोसपणे सुरू असलेले ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा

The 'sex racket' of the upper-upper class displaced | उच्चभू्र वर्गातील ‘सेक्स रॅकेट’ उद्ध्वस्त

उच्चभू्र वर्गातील ‘सेक्स रॅकेट’ उद्ध्वस्त

Next

मुंबई : अंधेरी-कुर्ला रोडवरील सहार परिसरातील असलेल्या एका गेस्ट हाउसमध्ये राजरोसपणे सुरू असलेले ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला असता, वेश्या व्यवसायासाठी आलेल्या एका परदेशी तरुणीसह आठजणी आढळून आल्या. गेस्ट हाउसचा चालक भगीरथ
जानकी मंडळ (वय ४९, रा. नालासोपारा) याला अटक करण्यात आले आहे.
उच्चभू्र वर्गातील मंडळींचा या लॉजवर नेहमी वर्दळ असायची. त्यांना या ठिकाणी तरुणी पुरविल्या जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. परदेशी तरुणीबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
वेश्या व्यवसाय करणाऱ्याचे पुनर्वसन करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख जेम्स बाबू वर्गीस यांनी सहार येथील मिरज हॉटेलजवळील गेस्ट हाउसमध्ये कुंटणखाना सुरु असल्याची माहिती सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन
भारती यांची भेट घेऊन दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्या ठिकाणी बोगस गिऱ्हाईक पाठविले. काही तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणून एका खोलीत ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर
पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.
आठ मुलींमध्ये एक परदेशी असून, अन्य बहुतांश जणी या पश्चिम बंगालच्या आहेत. लॉज चालक भगीरथ जानकी हा या परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे कुंटणखाना चालवितो, उच्चभू्र वर्गातील पुरुष, तरुणांना आपली वासना शमविण्यासाठी मुली
तो पुरविण्याचे काम करीत होता. त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सहार पोलिसांकडून सांगण्यात आले. लॉजमध्ये सापडलेल्या आठ तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The 'sex racket' of the upper-upper class displaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.