महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; बंगळुरूच्या डॉक्टरवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:04 AM2018-04-19T02:04:46+5:302018-04-19T02:04:46+5:30
लग्नाचे आमिष दाखवून येथील एका ख्यातनाम महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बंगळुरू येथील डॉक्टरवर करवीर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. संशयित डॉ. आकाश महादेव आवटी (रा. आवटी बिल्डिंग, गुलबर्गा) असे त्याचे नाव आहे.
कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून येथील एका ख्यातनाम महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बंगळुरू येथील डॉक्टरवर करवीर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. संशयित डॉ. आकाश महादेव आवटी (रा. आवटी बिल्डिंग, गुलबर्गा) असे त्याचे नाव आहे.
संशयित डॉक्टरने गोव्यातील हॉटेल आणि बंगळुरू येथील रूमवर नेऊन अत्याचार करून मोबाईलवर शूटिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पीडित महिला खेळाडूने तक्रारीत नमूद केले आहे.
सांगलीतील वधू-वर सूचक एजंटने पीडित महिलेची संशयित डॉ. आकाश आवटी याच्याशी ओळख करून दिली. दोघांची मने जुळल्याने डॉ. आवटी याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. ३१ डिसेंबर २०१६ रोजी गोव्यात नेले. तेथे जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर गोव्यातूनच तो २ जानेवारीला बंगळुरूला निघून गेला. पीडित स्वत:हून कोल्हापूरला आली. त्यानंतर ती त्याला बंगळुरूला भेटायला
जात होती. तेथील रूमवरही त्याने लैंगिक अत्याचार केला. लग्नाचा विषय काढल्यावर ‘तू काळजी करू नकोस आपल्याला लग्न करायचे आहे,’ असे म्हणत त्याने फेब्रुवारी २०१८ पर्यंत टाळाटाळ केली. ‘मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरले आहे. तू आता माझ्या आयुष्यात राहू नकोस, पुन्हा लग्नाचा विषय काढलास तर तुझे व्हीडिओ आणि फोटो व्हायरल करून ठार करेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयित आवटीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगळुरूला रवाना झाले आहे.