अल्पवयीन शाळकरी मुलींशी अश्लील वर्तन
By admin | Published: July 24, 2014 11:10 PM2014-07-24T23:10:21+5:302014-07-24T23:10:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व बारामती पंचायत समितीचा माजी सदस्य शिवाजी चव्हाण याने अल्पवयीन शालेय मुलींशी केलेले चाळे आज उघड झाले.
Next
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व बारामती पंचायत समितीचा माजी सदस्य शिवाजी चव्हाण याने अल्पवयीन शालेय मुलींशी केलेले चाळे आज उघड झाले. आज सकाळी 9 अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन, विनयभंग, अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याअंतर्गत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरूम (ता. बारामती) येथील 8 ते 9 अल्पवयीन मुली रोज 8 वाजता वाणोवाडी येथे बाजारतळावर बी. जी. क्लासेसला येतात. त्यातील एका मुलीची सायकल पंक्चर झाल्याने सर्व मुली पंक्चर काढण्यासाठी वाणोवाडी सिनेमा चौकात येत होत्या. या सर्व मुली काटकर दवाखान्याजवळ आल्या असता आरोपी शिवाजी पांडुरंग चव्हाण (वय 6क्, रा. वाणोवाडी, मळशी, ता. बारामती) त्याच्या चारचाकी गाडी (क्रमांक एम. एच. 42/5353) या क्रमांकाच्या गाडीतून तेथे आला. सायकल पंक्चर काढायला निघालेल्या 8 ते 9 अल्पवयीन मुलींच्या शेजारी गाडी उभी करून ‘मुलींनो, तुम्ही कुठल्या?’ अशी विचारणा केली. या वेळी सर्व मुलींनी आपल्या चेह:यावर स्कार्प बांधले होते. मी कोण आहे, माहीत आहे का तुम्हाला? मी अमुक तमुक असल्याचे सांगत मुलींना स्वत:च्या खिशातील आयकार्ड काढून दाखविले. आरोपीने चार मुलींच्या चेह:यावरील स्कार्प ओढून काढले. त्यानंतर एका मुलीचा जबरदस्तीने गाल धरून ओढला. एकीच्या पाठीवरून हात फिरविला, तर एकीच्या खांद्यावर हात ठेवला. यावर एका मुलीने ‘काका, तुम्ही असे का करता?’ अशी विचारणा केली.
त्यावर तू गप्प बस, नाही तर तुङया कानाखाली देईल. सायकल पंक्चर झालेल्या मुलीला चव्हाण म्हणाला, ‘तुझी सायकल इथेच ठेव. चल माङया गाडीत बस.’ त्या मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला. तरी देखील ‘चल चिकणो, आता मी जातो,’ असे म्हणत मुलींना लज्ज उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग केला. तसेच, मुलींना घाणोरडय़ा भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी शिवाजी चव्हाण निघून गेला. घाबरलेल्या मुलींनी घरी जाऊन हा प्रकार पालकांना सांगितला. संतप्त झालेल्या पालकांनी थेट वडगाव निंबाळकर पोलीस ठाणो गाठले. त्यानंतर गावातीलच काही राजकीय मंडळींनी पालकांची समजूत काढून प्रकरण दडपण्याचा दिवसभर प्रयत्न केला. मात्र, पालकांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .
वडगाव निंबाळकर पोलिसांनी भादवि कलम 354 अ (1) अंतर्गत व बाललैंगिक आत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर आरोपी चव्हाण पसार झाला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.