आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, १२ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 05:52 PM2016-11-03T17:52:10+5:302016-11-03T22:16:52+5:30

तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली

Sexual harassment on a minor girl in the ashram school, 12 people arrested | आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, १२ जणांना अटक

आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, १२ जणांना अटक

Next
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 03 - तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक यांच्यासह १२ जणांना ताब्यात घेतले आहे.  या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी याबाबतचे आदेश दिले.
 
खामगाव तालुक्यातील पाळा येथे स्व.निनाभाऊ कोकरे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आहे. प्राथमिक शाळेत १ ते ७ वी पर्यंत तर माध्यमिक शाळेत ८ ते १० वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. दरम्यान दिवाळीच्या सुट्टया लागल्याने विद्यार्थी त्यांची गावी गेलेले आहेत. जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणाºया अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांना शाळेत मुलीवर अत्याचार होत असल्याची माहिती सांगितली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. सदर प्रकार गंभीर असल्याने पालकांनी गावातील पोलीस पाटील व सरपंच यांना माहिती दिली. सदर प्रकार माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांना सांगितला. आ.खडसे यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे सांगितले.  तसेच कृषीमंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. ना. फुंडकर यांनी पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणातील सर्व आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. गुरूवारी पिडीत मुलीच्या गावातील पालकवर्ग स्थानिक शहर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित झाले. यावेळी पोलिसांनी सदर प्रकरणातील १२ आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगुन कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. 
 
भाऊसाहेबांची पोलीस स्टेशनला भेट-
पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त पालकांनी गुरूवारी शहर पोलीस स्टेशनला धाव घेवून ठिय्या मांडला. यावेळी ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी पोलीस स्टेशनला भेट देवून घटनेची परिस्थिती जाणून घेतली. सदर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
 
लैंगिक प्रकरणात अनेक विद्यार्थीनी असण्याची शक्यता-
पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिकणा-या अल्पवयीन मुलीवर तेथीलच कर्मचा-यांनी लैंगीक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत मुलीने पालकांना घडलेली घटना सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र तिच्या मैत्रीणीने हा धक्कादायक प्रकार उघडकीस केला. पाळा येथील आश्रम शाळेत शेकडो विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. लैंगीक अत्याचाराला बळी पडलेली १० वर्षीय पिडीत मुलीसोबतच अनेक विद्यार्थीनींवर अत्याचार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.                        

Web Title: Sexual harassment on a minor girl in the ashram school, 12 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.