नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By admin | Published: August 7, 2016 11:05 PM2016-08-07T23:05:28+5:302016-08-07T23:05:28+5:30
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीला लावण्याच्या अमिषाने हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा:या नबीन सोहनलाल बेदी (24) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ७ : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीला लावण्याच्या अमिषाने हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा:या नबीन सोहनलाल बेदी (24) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याला 12 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.
तो पुण्याच्या शिरूर भागातील रहिवाशी आहे. कामाच्या शोधात असलेल्या दिव्यातील या मुलीला जॉब ऑफरह्णचे एक पत्रक मिळाले. त्यावर दिलेल्या मोबाईलवर तिने आधी संपर्क साधला. त्यावेळी तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर 27 जुलै रोजी त्याने ह्यआपको जॉब चाहिए क्या? अशी विचारणा केली. तिने होकार देताच त्याने 28 जुलै रोजी तिला कोपरीतील एका हॉटेलमध्ये त्याने बोलविले. तिथे काम क्यों करना चाहती है, तुम काम मत करो, मै आपको दुसरी जगह काम दिलवाउँगा, असे म्हणत तिला एका ज्यूसमध्ये गुंगीचे औषध त्याने पाजले. ती बेशुद्ध त्याने तिला रिक्षाने दिवा येथील साबेगावच्या एका गाळयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्यावर गुदरलेला हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. कोपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचे नाव पत्ता माहित नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. गोपाळ यांच्या पथकाने त्याचा नाव पत्ता शोधून काढला. त्यानंतर आरोपी नबीन हा शनिवारी घोडबंदर रोड येथील एका हॉटेलात येणार असल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली. तो त्या हॉटेलमध्ये येताच 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.