मठातील बाबाचा मुलीवर लैंगिक अत्याचार
By admin | Published: September 10, 2015 03:32 AM2015-09-10T03:32:44+5:302015-09-10T03:32:44+5:30
गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील ब्रिजभूषण बाबाने त्याच्या मठातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे
बीड/गेवराई : गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील ब्रिजभूषण बाबाने त्याच्या मठातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीला चटके दिले असल्याचा अघोरी प्रकारही वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आला आहे.
ब्रिजभूषण कृष्णा गुजर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पत्नीचे निधन झाल्यानंतर बीडमधील एका व्यक्तीने त्यांच्या दोन्ही मुलींचा सांभाळ करण्यासाठी कोणीच नसल्याने त्यांना गुर्जर बाबा यांच्या मठातील आश्रमामध्ये ठेवले होते. पीडित मुलगी सातवी पास झाल्यानंतर तिचे शिक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे ती मठातच राहू लागली. महिन्यापूर्वी पीडित मुलीचे वडील तिला भेटण्यास गेले असता ती मठात नव्हती. चौकशी केली असता ती बाबासोबत गेली असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी मुलीच्या तक्रारीनुसार रात्री बीड जिल्हा रुग्णालयात मुलीची तपासणी केली असता तिचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले. तसेच तिच्या हातावर व गुडघ्यावर चटके दिले असल्याची बाब समोर आली. बीड जिल्हा रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते मनीषा तोकले, अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे, अंनिसच्या कार्यकर्त्या प्राचार्या सविता शेटे यांनी पीडित मुलीची भेट घेऊन तिच्या वडिलांना आधार दिला आहे. (प्रतिनिधी)