सावत्र मुलींवर लैैंगिक अत्याचार

By admin | Published: February 28, 2017 01:23 AM2017-02-28T01:23:20+5:302017-02-28T01:23:20+5:30

वडिलांनीच आपल्या दोन सावत्र मुलींवर वर्षभर लैंगिक अत्याचार केला

Sexual violence at step girls | सावत्र मुलींवर लैैंगिक अत्याचार

सावत्र मुलींवर लैैंगिक अत्याचार

Next


पिंपरी : वडिलांनीच आपल्या दोन सावत्र मुलींवर वर्षभर लैंगिक अत्याचार केला. तसेच पत्नीच्या बहिणीच्या नऊ वर्षांच्या मुलीवरसुद्धा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे त्याची अगोदरची कृत्येही उघडकीस आली आहेत. याप्रकरणी त्या नराधमाविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, आरोपीचे पहिले लग्न २००३ मध्ये झाले होते. त्याने फिर्यादी महिलेबरोबर २०१० मध्ये लग्न केले. त्या महिलेचेसुद्धा पहिले लग्न झाले असून, तिला दोन मुली आहेत. आरोपीची पत्नी त्याच्याबरोबर राहत नव्हती. त्यामुळे नातेवाइकांनी त्याचे फिर्यादी महिलेशी लग्न लावून दिले होते.
(प्रतिनिधी)
>आरोपी वर्षभरापासून १० आणि १२ वर्षांच्या सावत्र मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. काही महिन्यांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळी आरोपीने माफी मागितली. मात्र आरोपी मुलींवर अत्याचार करीत राहिला. शिवाय फिर्यादी महिलेच्या बहिणीच्या नऊ वर्षांच्या मुलीवरही अत्याचार केले. त्यामुळे या महिलेने पोलिसांत धाव घेतली.

Web Title: Sexual violence at step girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.