शाडूच्या मूर्तींच्या मागणीत दुपटीने वाढ
By admin | Published: August 26, 2016 02:24 AM2016-08-26T02:24:58+5:302016-08-26T02:24:58+5:30
पर्यावरणविषयक जनजागृतीचा सकारात्मक परिणाम सण उत्सवावर होवू लागला आहे.
अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली- पर्यावरणविषयक जनजागृतीचा सकारात्मक परिणाम सण उत्सवावर होवू लागला आहे. आता इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल दिवसेदिवस वाढत चालला आहे. शाडूच्या मुर्तीच्या मागणीत गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असल्याचे मुर्तीकारांचे म्हणणे आहे. पुढच्या वर्षीत हा आलेख आनखी वाढेल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मानवी हस्तपेक्षामुळे पर्यावरणाचा र्हास वाढत चालला आहे. सण उत्सवाच्या माध्यमातून निसर्गाची हानी मोठया प्रमाणात होवू लागली आहे. त्यातली त्यात गणेशोत्सवाचा विचार केल्यास प्लास्टर आँफ पॅरिसच्या मुर्तींचा वापर सर्वाधिक गेल्या काही वर्षापासून होत आहे. त्याचबरोबर बाप्पांच्या मुर्तीला रासायनिक रंग दिले जातो ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून हानीकारक मानले जाते. प्लास्टर आँफ पॅरीस पाण्यात विरगळत नाही त्यामुळे विर्सजनानंतर मोठया प्रमाणात जलप्रदुषण होते. त्याचा परिणाम जलचरांवर होतोच त्याचबरोबर नैसिर्गक घटकांवर त्याचा परिणाम होतो. गेल्या काही वर्षात शाडूच्या मुर्तीची मागणी कमलीची घटली होती. प्लास्टर पॅरिसचे गणपती स्वस्त आण िआकर्षीत करणारे असल्याने भाविकांकडून अशा प्रकारच्या मुर्तींना अधिक पसंती दिली जावू लागली. मात्र हे करत असताना पर्यावरणाच्या संतुलनाकडे दुर्लक्ष झाले. पाण्याचे प्रदुषण होवू नये याकरीता काही पर्यावरणप्रेमी संस्थाकडून विसर्जनाकरीता कृत्रीम तलावाची निर्मिती गेल्या काही वर्षात करण्यात येवू लागली. गेल्या वर्षी लोखंडी पाडा येथे रोटरी क्लबने पुढाकार घेवून विर्सजनाकरीता कुत्रीम तलाव तयार केला त्यामध्ये शेकडो गणपतींचे विसर्जन करण्यात आले .त्यामुळे वडाळे तलावात होणाऱ्या जलप्रदुषणाची तीव्रता कमी झाली. इको फ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना आता अधिकाधिक गणेशभक्त, मंडळापर्यंत पोहचू लागली आहे. पर्यावरणाविषय जागृती झाल्याने पनवेल परिसरात आता इको फ्रेंडली गणेशोत्सवाला पसंती मिळू लागली आहे.सार्वजनिक गणपती मंडळापेक्षा घरगुती गणेशोत्सवाकरीता शाडूंच्या मुर्तींमध्ये यंदा वाढ झाली आहे.पनवेल नवीन पनवेल, कळंबोली येथून शाडूच्या मुर्तीची मागणी आली असल्याचे मुर्तीकारानी सांगितले.>रंग आणि
आरासही नैसर्गिक
बाप्पांच्या मुर्तींकरीता नैसिर्गंक रंग वापरण्याचे प्रमाण आता वाढत चालले आहे. त्याचबरोबर बाप्पाच्या आरास ही इको फ्रेंडली करण्याची मानिसकता वाढल्याचे दिसून येत आहे. नैसिर्गंक आरास करण्यावर भर दिला जात आहे.