उद्धव ठाकरेंकडून शाहरुखची पाठराखण, भाजपावर टीका
By admin | Published: November 6, 2015 09:28 AM2015-11-06T09:28:48+5:302015-11-06T09:29:11+5:30
गुलाम अली व कसुरी प्रकरणात राज्य व देशाची बदनामी झाले असे ज्यांना वाटले त्या सर्वांचे मुखवटे शाहरुखप्रकरणात गळून पडले असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - गुलाम अली व कसुरी प्रकरणात राज्य व देशाची बदनामी झाले असे ज्यांना वाटले त्या सर्वांचे मुखवटे शाहरुखप्रकरणात गळून पडले असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. शिवसेनेचे भांडण गुलाम अलींशी नसून पाकिस्तानशी आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
भाजपा नेत्यांनी शाहरुख खानविरोधात मुक्ताफळं उधळली असून यासंदर्भात शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाचा समाचार घेतला. एकीकडे गुलाम अलींना कार्यक्रमासाठी येण्याचे आवतन द्यायचे व दुस-या बाजूला शाहरुखला पाकमध्ये जायला सांगायचे असे दुतोंडी प्रकार सुरु आहे असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. शाहरुख मुस्लिम आहे म्हणून त्याला टार्गेट करणे चुकीचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. देशातील मुस्लिम तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करत असून याविरोधात कठोर पावले उचलायची गरज असताना राजकारणा्यांनी असहिष्णूता व असहिष्णूतेप्रकरणी शाहरुखनला मुसलमान म्हणून फटकारले योग्य नाही असे ठाकरेंनी नमूद केले. गुलाम अली यांनी भारतात न येण्याचा योग्य निर्णय घेतला असून त्यांनी सूराच्यआ जादूने पाकमधील फूत्कारी लोकांचे ह्रदयपरिवर्तन करावे असे त्यांनी म्हटले आहे.