शहीद कर्नल संतोष महाडिक यांची पत्नीही अखेर लष्करात !
By admin | Published: June 6, 2016 02:21 PM2016-06-06T14:21:20+5:302016-06-06T15:01:40+5:30
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा परिसरात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल महाडिक यांची पत्नी स्वाती याही देशसेसेवसाठी रुजू झाल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ६ - शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर वीरपत्नी स्वाती यांनी 'लोकमत'ला सांगितलं होतं की, ' माझी दोन्ही मुलं तर मिलिटरीतच जातील, पण मीही देशसेवेसाठी सारं आयुष्य झोकून देईन !'.. अखेर त्यांनी त्यांचा तो शब्द खरा करुन दाखविलाय. ही वीरपत्नीही नुकतीच '21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झालीय.
'सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड' अर्थात SSB च्या अत्यंत अवघड अशा परीक्षेत स्वाती पास झाल्या असून आता त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईकडे रवाना झाल्या आहेत. 'ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी' इथं त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. ही परीक्षा पास होण्यासाठी स्वाती महाडिक यांना सर्वसामान्य सैनिकांप्रमाणेच सर्व किचकट प्रक्रिया पार पाडावी लागली, फक्त वयाच्या अटीतून थोडीशी सूट मिळाली.
खडतर परिश्रमातून आर्मीची वर्दी
स्वाती महाडिक या ’21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झाल्या मात्र त्यांना आर्मीचा ड्रेस केवळ सहानुभूतीतून नव्हे, तर एका सामान्य सैनिकाला जे जे करावं लागतं, त्या सर्व खडतर परिश्रमातूनचा मिळाला आहे. त्यांना केवळ सूट मिळाली ते वयाच्या अटीतून. स्वाती या अवघड अशी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अर्थात SSB ची परीक्षा पास झाल्या. त्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईत दाखल झाल्या आहेत. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथं त्यांचं प्रशिक्षण होईल.
- जम्मू - काश्मीरमधील कुपवाडा परिसरात अतिरेक्यांशी लढताना 7 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचे सुपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण प्राप्त झालं होतं. पोगरवाडी इथं त्यांच्या पार्थिवासमोरच पत्नी स्वाती यांनी 'आपण स्वत: अन मुलं आर्मीतच जातील,' असा निर्धार केला होता. त्यावेळी हे वृत्त फक्त 'लोकमत'नंच प्रसिद्ध केलं होतं.