शहीद नितीन कोळी यांना मानवंदना

By admin | Published: October 31, 2016 01:11 AM2016-10-31T01:11:57+5:302016-10-31T01:11:57+5:30

सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणण्यात आल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली.

Shaheed Nitin Koli to be honored | शहीद नितीन कोळी यांना मानवंदना

शहीद नितीन कोळी यांना मानवंदना

Next


पुणे : जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडाजवळील मच्छली सेक्टरमध्ये शहीद झालेल्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणण्यात आल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्यावर दुधगाव (ता. मिरज) या मूळ गावी सोमवारी सकाळी अकरा वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी
शुक्रवारी रात्री शहीद झाले होते. मानवंदना देण्यात आल्यानंतर त्यांचे पार्थिव सांगलीकडे रवाना करण्यात आले.
कोळी यांचे पार्थिव रविवारी श्रीनगरहून एअर इंडियाच्या विमानाने रात्री नऊच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Shaheed Nitin Koli to be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.