श्रीहरी अणेंनी केकमधील विदर्भ महाराष्ट्रापासून केला वेगळा
By admin | Published: April 13, 2016 06:22 PM2016-04-13T18:22:58+5:302016-04-13T18:22:58+5:30
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा केक कापताना अणेंनी सुरीनं विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १३ - स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणें पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. जय महाराष्ट्रच्या वृत्तानुसार राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा केक कापताना अणेंनी सुरीनं विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा केला आहे.
अणेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरेंसह संयुक्त महाराष्ट्रवादी लोकांची कुरापत काढली आहे. अणेंनी महाराष्ट्र काय वाढदिवसाचा केक वाटला का तुकडे करायला. महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असे राज ठाकरे मुंबईतील जाहीर सभेत म्हणाले होते. राज ठाकरेंना दाखवण्यासाठी हा केक कापत असल्याचे वक्तव्यही अणेंनी केले आहे. वेगळ्या मराठवाड्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अणेंना महाधिवक्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अणेंच्या या कृतीवर शिवसेनाही संतप्त झाली असून हिम्मत असेल तर अणेंनी गुजरातचा असा केक कापून दाखवावा असा टोलाही शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी लगावला आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमची चळवळ सुरुच ठेवू असे श्रीहरी अणे यांनी सांगीतले. अणेंच्या या कारनाम्यावर मनसेने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अणेंना चोपूनच काढले पहिजे. केक सारखे अणे यांना देखील कापले पाहिजे. मनसे अणेंना आपल्या स्टाईलने उत्तर देईल अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे गटनेता संदिप देशपांडे यांनी दिली आहे