शैव-वैष्णवांचा पंढरीत मेळा
By admin | Published: April 18, 2016 02:57 AM2016-04-18T02:57:46+5:302016-04-18T02:57:46+5:30
देखिली पंढरी देही जनी वनी, एका जनार्दनी वारी करी....
- दीपक होमकर, पंढरपूर
देखिली पंढरी देही जनी वनी,
एका जनार्दनी वारी करी....
या अभंगाप्रमाणे रविवारी चैत्री एकादशीच्या निमित्त चंद्रभागेचे स्नान करून कुणी पांडुरंगाचे पददर्शन, कुणी मुख दर्शन घेतले, कुणी नामदेव पायरीवर माथा टेकला, तर कुणी कळसाला दंडवत घातला आणि नगरप्रदक्षिणा घालत शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आलेले शैव व पंढरीत जमलेले वैष्णव यांचा मेळा जमला होता.
चैत्री एकादशी अर्थात कामदा एकादशीनिमित्त पंढरपुरात लाख-दोन लाख भाविकांची गर्दी होत ती आज अडीच लाखांहून अधिक वाढली. सकाळी आठपर्यंत रांग दर्शन मंडपापासून सुमारे एक किलोमीटर लांब असलेल्या सारडा भवनपर्यंत गेली होती.
नामदेव पायरी समोर पाण्याची धार
अनेक कावडींनी पंढरीत आल्यावर कावड्यांना गडू बांधून त्यात चंद्रभागेचे पाणी आणले व पुन्हा वाजतगाजत हर हर महादेवच्या गजरात महाद्वारमार्गे नामदेव पायरीसमोर आणून चोखामेळा मंदिराजवळ पाण्याची धार लावली.