"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 05:01 PM2024-11-01T17:01:35+5:302024-11-01T17:02:34+5:30

शिवसेना नेते आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊतांना 'चुकीची चिठ्ठी उचलणारा पोपट', असे संबोधत निशाणा साधला आहे...

Shambhuraj Desai target sanjay raut overe their statement about MNS and Mahayuti | "चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

राज्यात मनसेच्या मदतीने महायुतीचे सरकार येईल, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यावर, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 50  जागाही मिळत नाहीत. कारण जर मनसेच्या मदतीने सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नसेल, तर 150 जागा यांना मिळतील (मनसे) आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील. खरेतर मुख्यमंत्रीही त्यांचाच (मनसे) व्हायला हवा हो मग..., असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर, आता शिवसेना नेते आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊतांना 'चुकीची चिठ्ठी उचलणारा पोपट', असे संबोधत निशाणा साधला आहे.

देसाई म्हणाले, "मी मागेही बोललो होतो, चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट. त्या पोपटाची आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी निघालेली नाही. ज्योतिषी पिंजऱ्यात पोपट घेऊन बसतो आणि एकदा, दोनदा, तिनदा गेल्यानंतर आपण म्हणतो की या पोपटाकडून चुकीचीच चिठ्ठी निघते. यानंतर आपण पोपटवाला बदलतो आणि दुसऱ्या पोपटवाल्याकडे जातो, चिठ्ठी खरी निघते का, हे बघण्यासाठी. तसेच हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे. आजपर्यंत संजय राऊत जे काही बोलले आहेत, ते कधीही खरे झालेले नाही. ते हवेत बोलत असतात, यामुळे त्यांच्या विधानाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता नाही." ते साताऱ्यात टीव्ही९ सोबत बोलत होते.

मनसे संदर्भात बोलताना देसाई म्हणाले, मनसे हा निश्चितपणे एक हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे आणि हिंदुत्ववादी  विचाराच्या पक्षांनी निश्चितपणे यायला हवे. याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र बसून निर्णय घेतील. जो काही निर्णय होईल, त्याची आम्ही सर्वजण अंमलबजावणी करू.


 

Web Title: Shambhuraj Desai target sanjay raut overe their statement about MNS and Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.