शंकराचार्य म्हणतात, महिलांनी प्रथा परंपरा पाळाव्यात

By admin | Published: January 28, 2016 02:31 PM2016-01-28T14:31:00+5:302016-01-28T14:31:00+5:30

धर्माच्या क्षेत्रामध्ये प्रथा परंपरांचा विचार व्हायला हवा असं सांगत शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यास विरोध

Shankaracharya says women should follow tradition | शंकराचार्य म्हणतात, महिलांनी प्रथा परंपरा पाळाव्यात

शंकराचार्य म्हणतात, महिलांनी प्रथा परंपरा पाळाव्यात

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - महिलांना सामाजिक न्याय मिळायला हवा, परंतु धर्माच्या क्षेत्रामध्ये प्रथा परंपरांचा विचार व्हायला हवा असं सांगत शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यास विरोध दर्शवला आहे.
या मुद्यावर अनेक मान्यवरांचे एकमत होत असताना, महिलांच्या समान अधिकारांच्या बाजुने सगळे एकत्र होत असताना शंकराचार्यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे श्री श्री रविशंकर यांच्यासारख्या ज्येष्ठांनीही महिला पुरूष समानतेवर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महिलांना समान वागणूक मिलायला हवी आणि त्यादृष्टीने धार्मिक नेत्यांनी पावले उचलायला हवी असे सांगत राजसत्ता महिलांच्या बाजुने असल्याचे सुतोवाच केले आहे.

Web Title: Shankaracharya says women should follow tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.