शंकरपट पुन्हा रंगणार !

By admin | Published: January 9, 2016 03:09 AM2016-01-09T03:09:07+5:302016-01-09T03:09:07+5:30

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोकप्रिय असलेली बैलगाडा शर्यत अर्थात शंकरपट आता पुन्हा रंगणार आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी या खेळाला सशर्त मंजुरी दिल्याने शंकरपटप्रेमींनी त्याचे स्वागत केले आहे

Shankarapatra will play again! | शंकरपट पुन्हा रंगणार !

शंकरपट पुन्हा रंगणार !

Next

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोकप्रिय असलेली बैलगाडा शर्यत अर्थात शंकरपट आता पुन्हा रंगणार आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी या खेळाला सशर्त मंजुरी दिल्याने शंकरपटप्रेमींनी त्याचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता गावोगावी शंकरपटाचा थरार अनुभवता येणार आहे.
१९ महिन्यांनंतर लढ्याला यश। ७ मे २०१४ रोजी बैलगाडी शर्यतीवर बंदी आली होती. त्यानंतर नाराज झालेल्या शौकिनांनी आंदोलनाला सुरूवात केली. मात्र, तत्कालीन सरकारने याची दखलही घेतली नाही. आता ही बंदी उठविण्यात आल्याने गावोगावी फटाक्यांची आतशबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
...अन् दोन वर्षांच्या लढ्याला यश आले!
प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
ग्रामिण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी अन्यायकारक होती. ती बंदी उठवावी म्हणून गेल्या दोन वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न केले. भाजप अन् स्वाभिमानीच्या अनेक खासदारांकडे याबाबत ठाम भूमिका मांडली. दहावेळा दिल्लीमध्ये शिष्ठमंडळ घेवून भेटलो. केंद्र सरकारने आज शर्यतीवरील बंदी उठवून बैलगाडी शर्यत प्रेमींना न्याय दिला आहे. दोन वर्षाच्या लढ्याला यश आले. याचा मनस्वी आनंद होत असल्याचे मत अखिल भारतीय बैलगाडी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष धनाजी शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
शिंदे म्हणाले, देशातल्या अनेक राज्यामध्ये बैलगाडीच्या शर्यती लोकप्रिय आहेत. मात्र, पेटा या प्राणीमात्र संघटनेने बैलगाडी शर्यतीदरम्यान बैलांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे हाल केले जाते, अशी भूमिका मांडल्याने काँग्रेस सरकारने शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, शेतकरी तर आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतात हे मत आम्ही पटवून द्यायला यशस्वी ठरलो. म्हणूनच आज केंद्रसरकारने हा चांगला निर्णय घेतला आहे. राज्यात पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू यांच्याबरोबर महाराष्ट्रतही बैलगाडी शर्यतींना शेतकऱ्यांची पसंती आहे. सातारा जिल्'ात तर गावोगावच्या यात्रांमध्ये सुमारे शंभर ठिकाणी बैलगाड्यांचे जंगी आयोजन केले जाते. या शर्यतींसाठी लाखोंची बक्षिसे ठेवली जातात. मात्र, गेली दोन वर्षे या शर्यतीच बंद झाल्याने बैलगाडी शर्यतीप्रेमींच्यात नाराजी झाली होती. याविरोधात शेतकरी रस्त्यावर आले होते. मीही संघटनेच्या माध्यमातून राज्यभर फिरून जागृती करण्याचे काम केले. आज सरकारच्या निर्णयाने माझ्यासह हजारो प्रेमिंना निश्चितच आनंद झाला आहे.
गोंदियात
लोकप्रिय
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यांमध्ये शंकरपटांची परंपरा होती. न्यायालयाच्या बंदीनंतरही काही गावांमध्ये छोट्या प्रमाणात शंकरपट भरविले जात होते. ४० ते ४५ लाखांची उलाढाल होत होती.
गडचिरोलीत परंपरा
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज, गडचिरोली येथे तीन दिवस शंकरपट भरतात. संक्रांतीपासून स्पर्धा सुरू होतात. त्यात २० ते २५ लाखांची उलाढाल होते.
वाशिम जिल्ह्यात
शंकरपट बंद
वाशिम तालुक्यातील वारा जहॉगिर गावचे माजी सरपंच आशूजी खोरले बैलगाडीच्या शर्यतींचे आयोजन करीत होते. १० वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. तेव्हापासून ही शर्यत बंद पडली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शर्यतींचे आयोजन करण्यात येत होते. मराठवाड्यासह ५० गावांमधील बैलजोडी या ठिकाणी शर्यतीत भाग घेत होत्या. भंडाऱ्यात ९० वर्षांची परंपरा
भंडारा जिल्ह्यात गोसे व परसोडी येथील शंकरपटाला ९० वर्षांची परंपरा होती. जिल्ह्यात स्पर्धेत सव्वा ते दीड कोटींची उलाढाल व्हायची.
‘झाडीपट्टी’तही
शर्यतीचा खेळ
चंद्रपूर जिल्ह्यात झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली तालुक्यात शंकरपट लोकप्रिय होते. शंकरपट, मंडई, नाटक असे हे समीकरण आहे. त्यातून २५ लाखांची उलाढाल होते. नागपूरमध्ये पाच लाखांहून अधिक उलाढाल व्हायची.
अकोला जिल्ह्यात आठ लाखांची उलाढाल!
शंकटपट अर्थात बैलांच्या शर्यतींवरील बंदी केंद्र सरकारने उठविल्याच्या निर्णयाचे जिल्'ातील शंकरपटप्रेमींनी स्वागत केले आहे. शंकरपटांमध्ये जवळपास आठ लाख रुपयांची उलाढाल होते. बैलजोडी मालकांसाठी ७०० ते १५०० रुपये शुल्क आकारण्यात येत होते.
२ लाखांची जोडी!
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील शंकरपटांमध्ये सावरा येथील दोन लाख रुपये किमतीची बैलजोडीही सहभागी व्हायची. या बैलजोड्यांची शर्यत पाहण्यास पंचक्रोशीतील शंकरपटप्रेमींची गर्दी
होत असे.
शर्यत बंदी उठल्याने
शिरोळमध्ये जल्लोष
केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने शिरोळ येथे जल्लोष करण्यात आला. येथील शिवाजी चौकात हालगी व फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करून साखर वाटप करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीवर बंदी घातली होती. शिरोळ ग्रामपंचायत मध्ये ग्रा.प.सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी शर्यत बंदी उठविण्यासाठी ठराव करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने, मोर्चा काढण्यात आले. २१ डिसेंबर २०१५ रोजी पुणे-बेंगलोर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते.
जालन्यात लाखो
रुपयांची उलाढाल
जालना जिल्'ातील ९ ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या शंकरपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. जालना जिल्'ातील घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ, घोन्सी बु., घोन्सी खु., मंगू जळगाव, तीर्थपुरी या ठिकाणी जवळपास ५ लाख रुपयांची शंकरपटाच्या माध्यमातून उलाढाल होते. तसेच अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे १ लाख, जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे २ लाख, मंठा तालुक्यातील गारटेकी येथे ५० हजार आणि जालना तालुक्यातील नाव्हा येथील ५० हजाराची बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून उलाढाल होते.
औरंगाबादेतही स्वागत
औरंगाबाद जिल्'ातही शंकरपट निर्णयाचे जिल्'ात स्वागत होत आहे. पैठण तालुक्यात मुदळवाडी, वाहेगाव, लोहगाव, पैठणखेडा, चितेगाव, दावरवाडी, नांदर, आडूळ, कडेठाण, बालानगर, वैजापुर तालुक्यात वैजापुर, शिऊर, लाडगाव, महालगाव, विनायकनगर, पालखेड. कन्नड तालुक्यात गणेशपुर, चिंचोली लिंबाजी केवळ या दोनच गावात ही स्पर्धा होत होती. सोयगाव तालुक्यात सोयगाव, बनोटी,गलवाडा (अ) येथेही शंकरपट होत होता.सिल्लोड तालुक्यात ४ ते ५ वर्षांपासून शंकरपट बंद आहे. परंतु बंदीपुर्वी सिल्लोड, लिहाखेडी सारोळा, डोंगरगाव, हळदा, हट्टी, उंडणगाव शंकरपटाच्या शर्यती होत होत्या.
नाशिकमध्ये यात्रोत्सव
नाशिक जिल्'ातील इगतपुरी, दिंडोरी, चांदवड व सिन्नर या चार तालुक्यात यात्रोत्सव काळात बैलगाडी शर्यती घेण्यात यायच्या. त्यात बक्षिसांसह शर्यतीवर सुमारे ३० ते ३५ लाखांपर्यंत उलाढाल व्हायची. सर्वाधिक शर्यती व उलाढालीत इगतपुरी तालुका अग्रेसर होता. इगतपुरी तालुक्यातील घोटी, अडसरे खुर्द, तळोशी, तळोघ, मुंढेगाव, धामणी, गोंदे व साकूर फाटा येथे घेतल्या जाणाऱ्या शर्यतींवर १८.५० लाखांची उलाढाल व्हायची. दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, खेडगाव, मोहाडी, म्हेळुस्के, जोपूळ, वरखेडा व कोशिंबे याठिकाणची उलाढाल ८ लाखांपर्यंत असायची. चांदवड तालुक्यातील वडाळीभोई, शेलुपुरी, खडकओझर, भोयेगाव, धोडंबे व पारेगाव येथे ३ ते साडेतील लाखापर्यंतची, तर सिन्नर तालुक्यातील लिंगटांगवाडी या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या शर्यतीत १ ते सव्वा लाखापर्यंत उलाढाल व्हायची.
शंकरपटाच्या शर्यतीत बुलडाणा जिल्'ातील अनेक बैलजोड्यांनी जिल्'ातच नव्हे, तर नजिकच्या मराठवाड्यातही झेंडा फडकवल्याचा इतिहास आहे. शंकरपटांच्या आयोजनामुळे १० लाखाच्या वर उलाढाल होत होती; मात्र बंदीनंतर ती थांबली.
सागवन येथील सदन कास्तकार व शंकरपटामध्ये नेहमी हिररीने भाग घेणारे कवडे दादा म्हणाले की, शंकरपटामध्ये पटावर लावणाऱ्या बैलजोडीला शेतकरी स्वत:च्या मुलाप्रमाणे जीव लावत होते. ही बैलजोडी कधीच शेतीत राबत नव्हती. त्यांचा खुराक वेगळाच असायचा. दोन वेळ अडीच ते तीन लिटर दुध, सकाळ संध्याकाळ गव्हाच्या पिठाचा उंडा खायला द्यावा लागत होता.
बदाम, काजू, अंजीर गावरान तूप, लोण्याचा गोळाही बैलांना द्यावा लागत होता. शर्यतीतील ही जोडी बाजारात विक्रीला काढल्यास १२ ते १५ लाख रुपयापर्यंत किंमत येत होती. घाटनांद्रा येथील शब्बीर शेठ, चांडोळचे पहीलवान, बंडू गुजर, सावकार ही मंडळी बैलांच्या शर्यती लावण्यात आघाडीवर होती. बुलडाणा जिल्'ातील अनेक शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांनी मराठवाड्यात पैज जिंकल्याचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी मागे घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. बैलाचा जंगली प्राण्यात वर्गीकरण करण्यास लावणाऱ्या प्राणी मित्र संघटनांना ही चपराक आहे. बैल व मालक हे नाते अतूट असून स्वत:च्या जिवापेक्षाही बैलाची काळजी मालक अधिक घेत असतो. एखादा बैलगाडी मालक बैलाचा छळ करीत असल्याने त्याची शिक्षा सर्वांनाच बसत होती. बैलगाडी मालकांनीही याची दखल घेवून वीणा लाठी-काठी शर्यती घेवून शासनाच्या धाडसी निर्णयाला पाठबळ द्यावे.
- अशोक जंगम, बैलगाडी मालक, औरवाड ता. शिरोळ
जि. कोल्हापूर
नागभीड तालुक्यातील मसली येथील अ‍ॅड.
दिगांबर गुरपुडे यांनी २०१३ पासून शंकरपटांवरील बंदीविरोधात न्यायालयात लढा दिला होता. बैल हा प्राणी वन्यजीवात मोडत नाही, त्यामुळे शंकरपट अवैध ठरू शकत नाही, असा त्यांचा युक्तीवाद होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठातील नंदीनी मराठे विरूद्ध सरकार या प्रकरणामध्ये अ‍ॅड. दिगांबर गुरपुडे सहभागी होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आमच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सातत्याने पाठपूरावा केला. आम्हीही प्रकाश जावडेकर यांना अनेकदा दिल्लीमध्ये जावून भेटलो. त्यांनी प्रश्न समजून घेतला आम्हाला न्याय दिला. भाजप सरकारचे आम्ही आभारी असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
- धनाजी शिंदे, अध्यक्ष,
अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनाका घालण्यात
आली होती बंदी?
प्रिव्हेन्शन आॅफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल संघटनेचे अध्यक्ष अनिल कटारिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात २००४ मध्ये याचिका दाखल करु न बैल व घोडे यांच्या शर्यतीवर बंदीची मागणी केली.
औरंगाबाद खंडपीठाने २००७ मध्ये अंतरिम निर्णय देऊन अहमदनगर जिल्ह्यात बैल व घोडा यांच्या शर्यतीवर बंदी आणली होती.
२०११ मध्ये सुप्रीम
कोर्टाने पाच प्राण्यांच्या प्रदर्शन व शर्यतीवर बंदी घातली होती. त्यात वाघ, माकड, बिबट्या, अस्वल आण िसांड यांचा समावेश होता.
११ जुलै २०११ रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश जारी करु न वाघ, सिंह, चित्ता, अस्वल आण िबैल यांच्या प्रदर्शन आण िशर्यतीवर बंदी आणली होती.
सांड याचा अर्थ बैल घेण्यात आल्याने बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली, असा आक्षेप बळीराजा प्राणी आण िबैलगाडी शर्यत बचाव समतिीने घेतला होता.
सातारा येथील बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समतिीने वारंवार मोर्चे, आंदोलने करु न शासन दरबारी चुकीचा अर्थ घेऊन घातलेली बंदी रद्द करण्याची मागणी केली होती. बैल पाळीव प्राणी असून बैलगाडी शर्यत महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ आहे.

Web Title: Shankarapatra will play again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.