शरद जोशींची मरणोत्तर बांधिलकी

By Admin | Published: December 27, 2015 12:34 AM2015-12-27T00:34:47+5:302015-12-27T00:34:47+5:30

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकरी यांना समृद्ध करण्यासाठी वेचले. आपल्यानंतर स्वकष्टार्जित कमाईची वाटणी करताना त्यांच्या डोळ्यासमोर शेतकरीच होता

Sharad Joshi's posthumous commitment | शरद जोशींची मरणोत्तर बांधिलकी

शरद जोशींची मरणोत्तर बांधिलकी

googlenewsNext

पुणे : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकरी यांना समृद्ध करण्यासाठी वेचले. आपल्यानंतर स्वकष्टार्जित कमाईची वाटणी करताना त्यांच्या डोळ्यासमोर शेतकरीच होता, हे त्यांच्या इच्छापत्रातील तरतुदीवरून दिसून येते़ इच्छापत्रात शेतकऱ्यांचा, सहकाऱ्यांचा, सेवेकऱ्यांचा आणि आपल्या वाहनचालकांचाही विचार त्यांनी केला. त्यासाठी काही लाखांची रक्कम त्यांना देऊ केली आहे़
पुणे जिल्हतील आंबेठाण येथे जोशींची शेती व अंगारमळा आहे़ येथील एकूण २१ एकर शेतजमिनीपैकी १५ एकर जमीन त्यांनी गेल्या वर्षी विकली़ उरलेल्या ६ एकरांसह या जागेवरील सभागृहाचा उपयोग शेतकरी संघटना प्रतिष्ठानसाठी करण्याची सूचना त्यांनी केली आहे़ त्याची तूर्तास जबाबदारी रवी काशीकर यांना सांभाळायची आहे़ पुण्यातील बोपोडी परिसरातील सदनिका त्यांच्या मुली गौरी व श्रेया यांच्या नावे संयुक्तपणे आहे़ त्या दोघी परदेशात वास्तव्यास आहेत़
जमीनविक्रीतून आलेल्या पैशांतून शेतकरी संघटकचे संपादक प्रा़ सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यासाठी २० लाख रुपये आणि २००८ पासून त्यांची देखभाल करणारे अनंत देशपांडे यांच्या नावे २० लाख रुपये तसेच १५ वर्षांपासून जोशींच्या गाडीचे वाहनचालक बबनराव गायकवाड यांना १० लाख रुपये देण्याची सूचना केली आहे़ हिंगणघाटच्या बुडीत शेतकरी सॉल्वंट या कारखान्याच्या भागधारक शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपयांचा वाटा दिला आहे़ यवतमाळ जिल्ह्यातील रावेर येथे सीता मंदिरासाठी १३ लाख रुपये ठेवले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Sharad Joshi's posthumous commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.