कोरेगाव-भीमामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंकडून वातावरणनिर्मिती, शरद पवारांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 04:43 PM2020-02-18T16:43:56+5:302020-02-18T16:48:48+5:30

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणे वेगळी असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sharad Pawar accuses Shambhaji Bhide and Milind Ekbote of creating environment in Koregaon-Bhima | कोरेगाव-भीमामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंकडून वातावरणनिर्मिती, शरद पवारांचा आरोप 

कोरेगाव-भीमामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंकडून वातावरणनिर्मिती, शरद पवारांचा आरोप 

googlenewsNext
ठळक मुद्दे'एल्गार प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असा आमचा आग्रह आहे''चौकशी झाल्यास सत्तेचा गैरवापर करणारे उघडे पडतील'1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता

मुंबई : एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरून सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच, कोरेगाव-भीमामध्ये ज्यावेळी घटना घडली. त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी त्या भागात वेगळं वातावरण तयार केले, असा आरोप शरद पवार यांनी केला. 

शरद पवार म्हणाले, "कोरेगाव-भीमामध्ये जी घटना घडली. त्यावेळेस आजू-बाजूच्या खेड्यांमध्ये अशी एक तक्रार आली की, संभाजी भिडे आणि एकबोटेंनी त्या भागात वेगळं वातावरण तयार केले. संभाजी महाराजांची जी समाधी होती. या समाधीचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीची जी समाधी होती. ती उद्ध्वस्त केली. वेगळं वातावरण तयार करण्यासंबंधीची मोहीमच घेतली. त्याचा परिणाम संघर्ष कधीही ज्या ठिकाणी पाहिला नाही, त्या ठिकाणी काही प्रमाणात हा संघर्ष झाला." 

याचबरोबर, कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणे वेगळी असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमाशी संबंध जोडण्यात आला. त्या परिषदेला हजर नसलेल्या लोकांना या प्रकरणात अडकवण्यात आले. त्यांच्यावर खटले भरून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यात काही पोलिसांचाही हात होता. काही सरकारी अधिकारीदेखील यात सहभागी होते, त्यांच्याबद्दल आमची तक्रार आहे. त्यामुळे एल्गार प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असा आमचा आग्रह आहे. तशी चौकशी झाल्यास सत्तेचा गैरवापर करणारे उघडे पडतील,' असे शरद पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आजच्या महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं- शरद पवार

शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान

मेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरू

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

Web Title: Sharad Pawar accuses Shambhaji Bhide and Milind Ekbote of creating environment in Koregaon-Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.