शिक्षक साहित्य संमेलनाला शरद पवार जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:26 AM2018-12-09T02:26:23+5:302018-12-09T02:26:40+5:30

गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar to attend Sahitya Sahitya Sammelan | शिक्षक साहित्य संमेलनाला शरद पवार जाणार

शिक्षक साहित्य संमेलनाला शरद पवार जाणार

googlenewsNext

मुंबई : गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षपदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. २३ डिसेंबर रोजी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. शिक्षक साहित्य संमेलनाचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली.

धनगर समाज आरक्षणासाठी भेट
मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही स्वतंत्र ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी करत भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष व याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पाटील म्हणाले, आदिवासी आणि धनगर समाजातील वाद टाळण्यासाठी पवार यांनी सरकारदरबारी मध्यस्थी करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयात सरकार वेळकाढूपणा करत असल्याने सर्वोच्च न्यायालयाचाही दरवाजा ठोठावणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar to attend Sahitya Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.