मराठ्यांच्या उद्रेकास सरकारी अनास्था कारणीभूत- शरद पवार
By Admin | Published: September 17, 2016 04:59 PM2016-09-17T16:59:25+5:302016-09-17T16:59:25+5:30
आरक्षणाबाबतची सरकारी अनास्था मराठा समाजाच्या उद्रेकास कारणीभूत आहे, ज्यांच्या हाती सूत्रे आहेत, त्यांच्याकडून काही निर्णयच घेतले जात नाहीत
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.17- आरक्षणाबाबतची सरकारी अनास्था मराठा समाजाच्या उद्रेकास कारणीभूत आहे, ज्यांच्या हाती सूत्रे आहेत, त्यांच्याकडून काही निर्णयच घेतले जात नाहीत, अशावेळी जनता रस्त्यावर उतरते, सरकारने चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा ठोस निर्णय घेतले पाहिजेत.अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.
शरद पवार यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरकारवर चांगलीच टीका केली.मराठा आरक्षण, मोर्चे,कोपर्डी घटना आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यावर पवार यांनी मतं मांडली. शेती आणि आरक्षणाबाबतची सरकारी अनास्था मराठा समाजाच्या उद्रेकास कारणीभूत आहे.केंद्राच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारनं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी पवारांनी केली आहे.