“शरद पवार निर्णय मागे घेतील असे वाटत नाही, मनावर दगड ठेवून...”; खास मित्र स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 02:54 PM2023-05-03T14:54:39+5:302023-05-03T14:57:43+5:30

Sharad Pawar: शरद पवारांनी हा निर्णय पूर्ण विचार करूनच घेतला असेल, यात बदल होण्याची शक्यता कमीच असल्याचे खास मित्रांनी स्पष्टपणे सांगितले.

sharad pawar closed friend vitthal maniyar reaction over retirement decision from ncp chief post | “शरद पवार निर्णय मागे घेतील असे वाटत नाही, मनावर दगड ठेवून...”; खास मित्र स्पष्टच बोलले!

“शरद पवार निर्णय मागे घेतील असे वाटत नाही, मनावर दगड ठेवून...”; खास मित्र स्पष्टच बोलले!

googlenewsNext

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय राज्यसभेची टर्म संपली की निवडणूक लढवणार नाही, असेही जाहीर केले. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार यांच्या कुटुंबातून, स्नेही मंडळींकडूनही यावर मत नोंदवले जात आहे. यातच आता शरद पवार यांनी पूर्ण विचार करून निर्णय घेतला असणार. कार्यकर्त्यांना मनावर दगड घेऊन तो स्वीकारावा लागू शकेल, असे शरद पवार यांच्या खास मित्रांनी म्हटले आहे. 

शरद पवार यांचे खास मित्र असलेले विठ्ठल मणियार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी निवृत्तीच्या निर्णयाबाबत ते म्हणाले की, शरद पवारांनी घेतलेला निर्णय धक्कादायक वाटणे स्वाभाविक आहे. कारण एखादी अनपेक्षित घडली की ती आपल्याला धक्कादायक वाटते. मात्र, त्यांनी घेतलेला निर्णय अचानकपणे घेतला, असे वाटत नाही. या निर्णयाचा परिणाम पक्षसंघटनेवर आणि इतर अनेक गोष्टींवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे विचार करूनच हा निर्णय घेतला असावा, असे मणियार यांनी म्हटले आहे. 

कार्यकर्त्यांना मनावर दगड ठेवून निर्णय मान्य करावा लागू शकेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी करत आहेत. याबाबत बोलताना विठ्ठल मणियार म्हणाले की, कार्यकर्त्यांना तसे वाटणे आणि त्यांची मागणी असणे स्वाभाविक आहे. मात्र, या निर्णयामागे शरद पवार यांचा महत्त्वाचा उद्देश असेल. इतर सामाजिक काम, अन्य कामांसाठी त्यांना वेळ द्यायचा असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांनी समजावले तर कार्यकर्त्यांना मनावर दगड ठेवून ऐकावे लागेल. शेवटी शरद पवार कुठे जात नाहीत. ते कार्यकर्त्यांमध्येच राहणार आहेत, असे विठ्ठल मणियार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक आपल्या पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे या अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा प्रवास ६३ वर्षांपासून अवरित सुरू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे, त्यामुळे अधिक मोह न करता मी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवृत्त होण्याचा निर्णय घेतो आहे, असे शरद पवार यांनी जाहीर केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: sharad pawar closed friend vitthal maniyar reaction over retirement decision from ncp chief post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.