“देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही, एवढेच असेल तर...”; शरद पवारांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 04:09 PM2024-08-17T16:09:27+5:302024-08-17T16:11:27+5:30

Sharad Pawar News: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर न केल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एनडीए आणि महायुती सरकारवर टीका करत आहेत.

sharad pawar criticized nda govt over not declared maharashtra assembly election | “देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही, एवढेच असेल तर...”; शरद पवारांचे आव्हान

“देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही, एवढेच असेल तर...”; शरद पवारांचे आव्हान

Sharad Pawar News: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरयाणा येथील निवडणुकांची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. यावरून आता शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका करत केंद्राला आव्हान दिले आहे. 

निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत बोलताना स्पष्ट केले की, २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक एकत्रितपणे घेण्यात आली होती. त्यावेळी जम्मू-काश्मीरची निवडणूक हा विषयच नव्हता. मात्र, आता आम्हाला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घ्यायची आहे. त्यातील जम्मू-काश्मीर, हरयाणाची निवडणूक आम्ही जाहीर केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड या दोन राज्यांची निवडणूक यावर्षी घ्यायची आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभेची निवडणूक व्हावयाची आहे. महाराष्ट्रात मोठा पाऊस पडत आहे आणि सणासुदीचेही दिवस आहेत असे म्हणत राजीव कुमार यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेतच एकप्रकारे दिले. पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. 

देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशाला संबोधित केले. यावेळी बोलतांना त्यांनी देशात वन नेशन, वन इलेक्शन असेल, अशी घोषणा केली होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. हे सरकार देशात अद्याप चार राज्यात एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य उरले नाही. त्यांनी म्हटल्याप्रमाणे ४ राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान शरद पवार यांनी केले. 

दरम्यान, महाराष्ट्रात निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विविध माध्यमांनी अशाच बातम्या दिल्या. केंद्रीय निवडणूक आयोग तातडीची पत्र परिषद घेणार असे वृत्त येताच महाराष्ट्राची निवडणूकही जाहीर होणार अशा बातम्या पसरल्या. प्रत्यक्षात तसे झाले नाही.
 

Web Title: sharad pawar criticized nda govt over not declared maharashtra assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.