Sharad Pawar Comedy Answer: शरद पवार 'ते' वाक्य बोलताच पत्रकार हसून लोटपोट; पाहा नक्की काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 05:48 PM2022-07-10T17:48:06+5:302022-07-10T17:49:20+5:30

Sharad Pawar Comedy Answer: आपल्या उत्तरानंतर शरद पवार स्वत:ही हसू लागले

Sharad Pawar gives super comedy answer to journalist in press conference and everyone started laughing see video | Sharad Pawar Comedy Answer: शरद पवार 'ते' वाक्य बोलताच पत्रकार हसून लोटपोट; पाहा नक्की काय घडलं

Sharad Pawar Comedy Answer: शरद पवार 'ते' वाक्य बोलताच पत्रकार हसून लोटपोट; पाहा नक्की काय घडलं

googlenewsNext

Sharad Pawar Comedy Answer: महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरात शासकीय महापूजा केली. भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने त्यांना हा बहुमान मिळाला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर तब्बल ८-१० दिवसांनी शिंदे गट मुंबईत आला व सत्तास्थापना झाली. एकनाथ शिंदे गटावर विरोधी पक्षाकडून रोज नवनव्या टीका केल्या जात आहेत. आज औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य करताना एक भन्नाट उत्तर दिले आणि त्यानंतर सारेच उपस्थित पत्रकार हसून लोटपोट झाल्याचे दिसून आले.

राष्ट्रपतीपदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी लढवावी अशी बिगरभाजपा पक्षांची अपेक्षा होती, पण शरद पवारांनी यास नकार दिला. याचसंबंधी प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला आणि पवारांच्या उत्तराने हशा पिकला.

"राष्ट्रपती पदासाठी तुम्ही उमेदवारी नाकारली. आता जे दोन उमेदवार आहेत, त्यांच्यातील लढत एकतर्फी होतेय असं दिसतंय. तुम्ही जर रिंगणात असता तर कदाचित ही निवडणूक चुरशीची झाली असती असं वाटत नाही का?" असा प्रश्न शरद पवार यांनी विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी भन्नाट प्रतिप्रश्न केला. "तुम्हाला काय इथे (राज्यात) माझा कंटाळा आला आहे का?", असं अतिशय मजेशीर वाक्य पवारांनी उच्चारलं. त्यानंतर पत्रकारांमध्ये तुफान हशा पिकला. पत्रकार अक्षरश: हसूनहसून लोटपोट झाले.

दरम्यान, यामागची भूमिकाही पवारांनी समजावून सांगितली. "भाजपा वगळता इतर सर्व राष्ट्रीय पक्षांनी मला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला होता. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की हे ज्या पद्धतीचे पद आहे त्यासाठी उमेदवारीचा प्रस्ताव आपण स्वीकारू नये. कारण मी जर राष्ट्रपती झालो असतो तर माझ्यासारख्या माणसांमध्ये रमणाऱ्याला एका ठिकाणी जाणं आणि तिथंच जाऊन बसणं हे शक्य झालं नसतं", अशी भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.

Web Title: Sharad Pawar gives super comedy answer to journalist in press conference and everyone started laughing see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.