'हा जावई शोध तुम्ही कुठून लावला?', शरद पवारांचा पत्रकार परिषदेत चढला पारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:01 IST2025-01-14T13:59:36+5:302025-01-14T14:01:25+5:30
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार भाजपसोबत जाण्याची चर्चा मागील काही दिवसांपूर्वी झाली. याबद्दल जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांचा अचानक पारा चढला.

'हा जावई शोध तुम्ही कुठून लावला?', शरद पवारांचा पत्रकार परिषदेत चढला पारा
Sharad Pawar on BJP: पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकाराने शरद पवारांना प्रश्न विचारला भाजपसोबत जाण्याबद्दल. खासदार भाजपसोबत जायचं म्हणत असल्याबद्दल बातम्या आल्यात. तुमचं व्यक्तिगत मत काय? अशा आशयाचा प्रश्न ऐकताच पवार भडकले. शरद पवारांनी उत्तर दिलं आणि काही तरी तारतम्य बाळगलं पाहिजे, अशी तंबीही दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात एक चर्चा जोरात रंगली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या खासदारांच्या संपर्कात. त्या चर्चेवर नंतर पडदा पडला. पण, याच संदर्भात जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते चांगलेच भडकले.
शरद पवारांना कोणता प्रश्न विचारण्यात आला?
अशा बातम्या समोर येताहेत की, तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक खासदार असं म्हणताहेत की, आपण भाजपसोबत जाऊ. असं काही आहे का? तुमचं व्यक्तिगत मत काय आहे?
शरद पवारांनी काय उत्तर दिले?
या प्रश्नानंतर शरद पवारांचा पारा चढल्याचे दिसले. ते लगेच म्हणाले, "कसलं व्यक्तिगत मत? व्यक्तिगत मत काय द्यायचं? एकाही खासदाराचं असं मत नाहीये. हा जावई शोध तुम्ही कुठून लावला, हे मला माहिती नाही. आणि राज्याचा पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताहेत की, तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का? त्याच्यावर तुम्ही माझं व्यक्तिगत मत विचारत आहात. काही तरी तारतम्य बाळगायला पाहिजे", अशा शब्दात पवारांनी संताप व्यक्त केला.
इंडिया आघाडीतील संवाद खरंच संपलाय का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "अजिबात नाही, संवाद आहे. म्हणूनच मी सांगितलं की शक्य झालं तर आठ-दहा दिवसांत आम्ही बैठक बोलवत आहोत. मी स्वतः बोलवणार आहे."