'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 01:54 PM2024-11-13T13:54:16+5:302024-11-13T13:58:40+5:30

Sharad Pawar Chhagan Bhujbal News: विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतील पहिल्या फुटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. छगन भुजबळांनी शिवसेना पहिल्यांदा शरद पवारांनी फोडली असा आरोप केला आहे. त्यावर शरद पवारांनी भूमिका मांडली. 

Sharad Pawar has rejected the allegations made by Chhagan Bhujbal Pawar said that I did not break Shiv Sena I didn't do anything wrong | 'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

Sharad Pawar on Chhagan Bhujbal: 'पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवारांनी केले', असे म्हणत छगन भुजबळशरद पवारांवर घेरले. भुजबळांनी केलेल्या आरोपावर शरद पवारांनी भूमिका मांडली. ज्यावेळी भुजबळांसह काही आमदार फुटले, त्यावेळची घटना पवारांनी सांगितली आणि भुजबळांनाच उलट सवाल केला. 

'छगन भुजबळ म्हणत आहेत की, शिवसेना पहिल्यांदा फुटली, ती पवारांनीच फोडली. माझ्यात काही ताकद नव्हती शिवसेना फोडण्याची, पवारांमुळेच शिवसेना फुटली', असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. 

"मी शिवसेनेत नव्हतो, माझी जबाबदारी काय?"

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "मी कोणत्या पक्षात होतो? मी शिवसेनेत नव्हतो. त्यामुळे माझी जबाबदारी काय? मी आमचा जो विरोधी पक्ष आहे, त्याला शक्ती द्यायचं काम माझं आहे की, त्याला कमकुवत करण्याचं काम माझं आहे?", असा उलट प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. 

शरद पवार पुढे म्हणाले की, "आमचा पक्ष हा मजबूत करायचा असेल, तर त्या पक्षाला काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, ज्या संघटना आहेत. त्यांच्यावर आमचा आघात राहणार. त्यातून आपली शक्ती वाढेल कशी याची खबरदारी घ्यायची."

आम्ही संपर्क केला, त्यात चुकीचे काही नाही -शरद पवार

"ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की, छगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी त्या पक्षात (शिवसेना) अस्वस्थ आहेत आणि बाहेर पडायच्या नादात आहे. संपर्क साधू इच्छितात. जरूर आम्ही संपर्क साधला आणि त्यामध्ये चुकीचे काही नाही", असे शरद पवार छगन भुजबळ यांच्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले. 

छगन भुजबळांचं आरोप काय?

"१९९१ मध्ये शिवसेना फोडण्याच पुण्यकर्म शरद पवार यांनीच केले. मी शिवसेना फोडू शकत नव्हतो. ३६ लोकांची स्वाक्षरी झाल्यानंतर मी शेवटी स्वाक्षरी केली. कुठलाही दोष नसताना मला तेलगी प्रकरणात गोवण्यात आले अधिकाऱ्यांमधील वाद होते. मला राजीनामा द्यायला लावला", असे भुजबळ शरद पवारांबद्दल बोलताना म्हणाले. 

Web Title: Sharad Pawar has rejected the allegations made by Chhagan Bhujbal Pawar said that I did not break Shiv Sena I didn't do anything wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.