Sharad Pawar: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार? शरद पवारांनी वाढवला संभ्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 09:25 AM2023-04-24T09:25:09+5:302023-04-24T09:27:38+5:30

Sharad Pawar: महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याबाबत वारंवार भाष्य करत आहेत. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे पुढील निवडणुकांमध्ये मविआच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Sharad Pawar: How can you tell now whether MVA will fight together in 2024 elections? Sharad Pawar has increased the confusion | Sharad Pawar: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार? शरद पवारांनी वाढवला संभ्रम 

Sharad Pawar: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार? शरद पवारांनी वाढवला संभ्रम 

googlenewsNext

अगदी वर्षभरावर आलेली लोकसभेची निवडणूक आणि दीड वर्षावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करत आहे. तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याबाबत वारंवार भाष्य करत आहेत. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, एकत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आताच सांगता येणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.  

एकीकडे संजय राऊत हे २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रच लढणार, असं संजय राऊत हे वारंवार सांगत आहेत. उद्धव ठाकरे हेही एकत्र लढण्यास उत्सुक आहेत. मात्र शरद पवार यांनी केलेल्या या विधानामुळे एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. 

२०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार का आणि वंचित आघाडी सोबत येणार का, असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीशी अद्याप चर्चा झालेली नाही. आज आमची महाविकास आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. मात्र इच्छा असणं पुरेशी नाही. जागावाटप आणि इतर काही मुद्दे महत्त्वाचे असतात. याबाबत अजून चर्चा केलेलीच नाही, त्यामुळे आघाडीबाबत आजच कसं सांगणार, असे शरद पवार यांनी सांगितले.  

Web Title: Sharad Pawar: How can you tell now whether MVA will fight together in 2024 elections? Sharad Pawar has increased the confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.