“माझ्या संपर्कात कोणीही नाही, पण...”; पक्षात येण्यास इच्छुकांवर शरद पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 04:51 PM2024-07-09T16:51:34+5:302024-07-09T16:53:21+5:30

Sharad Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

sharad pawar indicative statement on those willing to join the ncp sp party | “माझ्या संपर्कात कोणीही नाही, पण...”; पक्षात येण्यास इच्छुकांवर शरद पवारांचे सूचक विधान

“माझ्या संपर्कात कोणीही नाही, पण...”; पक्षात येण्यास इच्छुकांवर शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते, आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज्य सरकारने योजना जाहीर केल्या. परंतु, माझा अनुभव आहे की, अंदाजपत्रक मांडल्यानंतर ६ महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. पण, इथे केवळ ८ दिवसांत पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसते. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे, असे असले तरी संपूर्ण राज्यात ही योजना पार पाडता येईल का? याबाबत शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

पक्षासाठी स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय महत्त्वाचा

आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी या चिन्हामुळे फटका बसला. सध्या आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना देण्यात आले. हे सगळे प्रकरण कोर्टात आहे. पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे स्वागत शरद पवारांनी केले. परंतु, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत साशंकता बोलून दाखवली. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही. जयंत पाटील यांना ते लोक भेटतात, याची माहिती मला आहे. त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचे मतदान झाल्यावर कळेल.

 

Web Title: sharad pawar indicative statement on those willing to join the ncp sp party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.