शरद पवार आगीत तेल ओतत आहेत; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:28 AM2024-07-29T05:28:56+5:302024-07-29T05:29:39+5:30

राज्यात दंगली घडवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

sharad pawar is adding fuel to the fire allegation of prakash ambedkar | शरद पवार आगीत तेल ओतत आहेत; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

शरद पवार आगीत तेल ओतत आहेत; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, माढा (जि. सोलापूर) : खा. शरद पवारांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. मराठा व ओबीसी समाजामधील सामाजिक दरी कमी करण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचे काम पवार करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे  प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

माढ्यातील ओबीसी आरक्षण  यात्रेदरम्यान ते बोलत होते. राज्यात दंगली घडवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

Web Title: sharad pawar is adding fuel to the fire allegation of prakash ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.