शरद पवार समोर बसलेत, अन निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय पक्ष कोणाचा; राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:41 PM2023-11-10T12:41:27+5:302023-11-10T12:42:22+5:30

सगळे भाजपाचे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत, त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे. - संजय राऊत

Sharad Pawar is sitting in front, and the Election Commission has a question about whose party; Sanjay Raut Tagets EC, BJP | शरद पवार समोर बसलेत, अन निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय पक्ष कोणाचा; राऊतांचा टोला

शरद पवार समोर बसलेत, अन निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय पक्ष कोणाचा; राऊतांचा टोला

निवडणूक आयोगासमोर दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कुणाची हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा, हे आश्चर्य आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील निर्माण झालेला होता. ज्यांनी बेईमानी केली होती त्यांनी फक्त आमदार पळवले, पक्ष नाही. पक्षावर ताबा मिळविण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिलेले होते. पण इलेक्शन कमिशनने त्याचा संदर्भ घेतला नाही आणि एकतर्फी निर्णय घेतला. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील तोच प्रश्न उपस्थित होतोय. देशाचं दुर्दैव आहे की, इलेक्शन कमिशनला कळत नाही की या पक्षाची मालकी नेतृत्व कोणाकडे आहे. पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे, पण इलेक्शन कमिशनला माहित नाही, असा टोला राऊतांनी लगावला.

पुर्वीच्या काळी अशा टोळ्या होत्या, जे कबिल्यांचा ताबा घ्यायच्या आणि लुटमार करायच्या आणि अशा टोळ्या राजकारणात भाजपने निर्माण केल्या आहेत आणि पक्षांचा ताबा घेतला जातोय. घटनात्मक संरक्षण त्यांना दिले जातेय हे दुर्दैव आहे. इलेक्शन कमिशनने काहीही निर्णय घेऊद्या, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि पुढे देखील राहील, इलेक्शन कमिशन हे घटनात्मक संस्था आहे पण सध्या पिंजऱ्यातला पोपट झालेला आहे आणि पिसे देखील जळून गेलेली आहेत, नुसता फडफडतो, असा टोला राऊतांनी लगावला.

जो निकाल 2024 झाली महाराष्ट्रात लागणार आहे, तोच पाच राज्यांत लागणार. यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नाही आणि हेच नेते तिकडे जाऊन प्रचार करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होतोय. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून ज्या पद्धतीने आपले सगळे भाजपाचे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत, त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे. उगाच घोडे कशाला नाचवत आहात, असा सवालही राऊत यांनी केला. 

Web Title: Sharad Pawar is sitting in front, and the Election Commission has a question about whose party; Sanjay Raut Tagets EC, BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.