शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले - सुशीलकुमार शिंदे

By admin | Published: September 4, 2016 03:13 PM2016-09-04T15:13:57+5:302016-09-04T16:27:24+5:30

सुशीलकुमार शिंदे यांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त निमित्त इंदिरा गांधी स्टेडियमवर अमृतमहोत्सवी सोहळा साजरा होत आहे.

Sharad Pawar learned a lot from him - Sushilkumar Shinde | शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले - सुशीलकुमार शिंदे

शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले - सुशीलकुमार शिंदे

Next

ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. ४ - मी जे कर्तृत्व केले हे सोलापूरकरांचे आहे. कठीण प्रसंगात व आनंदाच्या प्रसंगात तुम्ही मला साथ दिली. सोलापूरकरांमुळे मला यश मिळवणं शक्य झालं ते तुम्हालाच अर्प्ण करतो. आता घेऊन जाण्यासारखे काहीच राहिलेले नाही अशा शब्दात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या अमृतमहोत्सवी सोहळयात भावना व्यक्त केल्या. 
 
पंचाहत्तरीनिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावरचे अनुभव सांगितले. शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. शरदपवार जसे विद्वान आहेत तसे स्टॅटीजिक आहेत कुणाची चड्डी ओढायची म्हटलं तर ते सहज ओढू शकतात त्यांच्या सहवासात मला रहायला मिळालं असे शिंदे म्हणाले. 
 
सोलापूरकरांच्या पाठिंब्यामुळे एक छोटासा मुलगा देशाच्या मोठया पदापर्यंत जावू शकला, मी करेल त्या कामाला तुम्ही साथ दिली असे सुशीलकुमार शिंदेंनी सांगितले. ४० वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधीही वाढदिवस साजरा केला नाही. ज्या गरिबीत दारिद्र्यात वाढलो तिथ वाढदिवसाची प्रथा नव्हती. 
 
पण मंत्री झाल्यावर गर्दी व्हायला लागली वाढदिवसाचा हट्ट होत होता. म्हणून मी वाढदिवसाच्या दिवशी बाहेर जायचो पण यंदा डी वाय पाटील, खरटमल इतर मित्रांनी गळ घातली. राष्ट्रपतीनी कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शविली म्हणून वाढदिवस साजरा करायला होकार दिला असे सुशिलकुमार शिंदेंनी सांगितले.  
 
तिकीट मिळेल म्हणून नोकरी सोडली पण तिकीट गेलं आणि नोकरीही गेली पण वकिलीची डिग्री होती. इच्छा असेल तेथे मार्ग असतो असे शिंदे म्हणाले. प्रणव मुखर्जी यांनी मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसविले असे शिंदे यांनी सांगितेल. पक्षाला सत्ता मिळवून दिल्यानंतरही मुख्यमंत्रीपद गेले पण पक्षाचा निर्णय मान्य करायचा असतो असे त्यांनी सांगितले.
 
सुशीलकुमार शिंदे यांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त निमित्त इंदिरा गांधी स्टेडियमवर अमृतमहोत्सवी सोहळा साजरा होत आहे. पद्मजा फेणाणींच्या सुरावटीने या वाढदिवस समारंभास सुरुवात झाली. स्वत: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या कार्यक्रमासाठी सोलापूरात आले आहेत. अनेक व्हीव्हीआयपी या कार्यक्रमासाठी सोलापूरात आले आहेत. 
 
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजयबाबू दर्डा यांचे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. उज्वला शिंदे, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब विखे- पाटील, आमदार भारत भालके, आमदार दिलीप सोपल कार्यक्रमात पोहोचले आहेत. मान्यवरांच्या स्वागतासाठी सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या स्मृती, प्रिती, प्रणिती कार्यक्रमस्थळी आहेत. 
 
सुशिलकुमार शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांच्या जनवात्सल्य या सोलापूरच्या निवासस्थानी माजी मंत्री, मित्र, पाहूणे, कार्यकर्ते, नेते यांची गर्दी होत आहे. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारताना शिंदे गहिवरुन गेले होते.
 
 
 
 

Web Title: Sharad Pawar learned a lot from him - Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.