Chhagan Bhujbal Nitin Gadkari: छगन भुजबळांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, काय आहे विषय.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:59 PM2022-11-22T12:59:39+5:302022-11-22T12:59:59+5:30

काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्याच कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक विधान केले. राज्यपालांच्या त्या विधानावरून बराच वादंग निर्माण झाला.

Sharad Pawar led NCP leader Chhagan Bhujbal writes letter to BJP Minister Nitin Gadkari Read details | Chhagan Bhujbal Nitin Gadkari: छगन भुजबळांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, काय आहे विषय.. वाचा सविस्तर

Chhagan Bhujbal Nitin Gadkari: छगन भुजबळांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, काय आहे विषय.. वाचा सविस्तर

Next

Chhagan Bhujbal letter to Nitin Gadkari: काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्याच कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक विधान केले. नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरव करताना राज्यपाल कोश्यारी यांनी जे विधान केले त्यामुळे अनेक शिवप्रेमींची मने दुखावली गेली. राज्यपालांच्या त्या विधानावरून बराच वादंग निर्माण झाला. मात्र, आज राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एका वेगळ्याच कारणासाठी नितीन गडकरींना पत्र लिहीले आहे.

मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रीट रस्ता करण्यात यावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, आपण ४ ऑक्टोबर २०१४ रोजी नाशिक मधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा सहापदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे लवकरात लवकर हे सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले जावे. नाशिक ते मुंबई हा फोर लेन रस्ता आहे.  या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे.  शहापुर ते वडपे परिसरातील अत्यंत रहदारीच्या परिसरात कुठलेही उड्डाणपूल नसल्याने याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा  निर्माण होतो. जलद शहरीकरणासह, मुंबईशी समीपता आणि शहापूर तालुक्यातील लॉजिस्टिक्स पार्कचा प्रसार त्यामुळे  या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी तासंतास प्रवाश्यांचा वेळ यामध्ये जात आहे. लॉजिस्टिक्स पार्कमुळे मोठमोठे कंटेनर क्रॉसिंग व कंटेनर वाहतुकीमुळे सतत वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र या सहापदरी रस्त्याचा डी.पी.आर मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु व्हायला शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे विलंब होणार आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नुतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबी मधील कामाचे तात्काळ नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन २०१४ मध्ये झालेले आहे. टोलवसुली कंत्राटदराने दर पाच वर्षाने या रस्त्याचे संपूर्ण बळकटीकरण करण्याची अट या कामाच्या आदेशात आहे. मात्र संबधीत कंपन्यांकडून करारातील स्पेसिफिकेशनप्रमाणे सुधारणा केली जात नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी उंचवटे व खोलगट भाग तयार झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सहापदरी रस्त्याचे प्रत्यक्ष काम होईपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Web Title: Sharad Pawar led NCP leader Chhagan Bhujbal writes letter to BJP Minister Nitin Gadkari Read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.