Karnataka Maharashtra Border Dispute: "सीमेपलीकडून हल्ले अन् शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देतंय", NCPचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 12:04 PM2022-12-08T12:04:05+5:302022-12-08T12:04:51+5:30

"मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?", जयंत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

Sharad Pawar led NCP Maharashtra Chief slams Shinde Fadnavis government over border dispute issues with Karnataka | Karnataka Maharashtra Border Dispute: "सीमेपलीकडून हल्ले अन् शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देतंय", NCPचा आरोप

Karnataka Maharashtra Border Dispute: "सीमेपलीकडून हल्ले अन् शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देतंय", NCPचा आरोप

googlenewsNext

BJP vs NCP Karnataka Maharashtra Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील सीमाप्रश्न काहीसा नाजुक वळणावर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितला होता. त्यानंतर, महाराष्ट्रातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले होते. तरीही हा वाद काही केल्या शमण्याचे नाव घेत नाहीये. बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. त्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्रातील कर्नाटकच्या बसेस वर 'जय महाराष्ट्र' लिहण्यात आले. असा सारा गोंधळ उडालेला असताना, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारवर एक गंभीर आरोप करत शेलक्या शब्दांत टीकादेखील केली आहे.

"सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे,याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे या सर्वावर विचार राष्ट्रवादीच्या  बैठकीत केला जाणार आहेत. पण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत, तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहेत अशामध्ये राज्य सरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून काम करत असतील तर हे दुर्दैवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमी आहे," अशा खोचक शब्दांत जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी सीमावादाच्या प्रश्नावर आक्रमक

सीमावादाच्या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने आता 'आरे ला कारे' ने उत्तर दिले पाहिजे. तर छगन भुजबळ यांनी तर थेट कर्नाटक सरकारलाच इशारा दिला. "जर कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल. इतर गावांची मागणी करणाऱ्या कर्नाटकने अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बीदर, भालकी इत्यादी गावे  महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा. ही दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मराठी माणसाला त्याचे उत्तर देता येत नाही असे नाही, पण महाराष्ट्राच्या संयमाचा अंत कर्नाटकने पाहू नये. बेळगावसह कर्नाटकातील मराठी माणसांसोबत आम्ही नेहमीच आहोत," असे भुजबळ म्हणाले.

Web Title: Sharad Pawar led NCP Maharashtra Chief slams Shinde Fadnavis government over border dispute issues with Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.