रोहित पवार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक; प्रोफाईल फोटोवर झळकला 'सिया राजपूत'चा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 09:18 PM2023-12-22T21:18:57+5:302023-12-22T21:22:02+5:30
रोहित पवार यांनी ट्विटरवरून अकाऊंट हॅक झाल्याची दिली माहिती
Rohit Pawar Facebook Account Hack : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे फेसबूक अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईलवर सिया राजपूत हे नाव दाखवले जात आहे. तसेच, फेसबुक कव्हर फोटोवरही सिया राजपूत असंच नाव दिसत आहे. "गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं. याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत," असे ट्विट रोहित पवार यांनी केलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 22, 2023
याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत.#facebookhack
रोहित पवार सामाजिक व राजकीय जीवनातील बहुतांश गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मतदारांपर्यंत व चाहत्या वर्गापर्यंत पोहोचवत असतात. ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडिया खाती हॅक होत असल्याचे प्रकार समोर आले आल्याचे ते म्हणत आहेत. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्याशिवाय या हॅक केलेल्या अकाऊंटच्या रिकव्हरीसाठीही प्रयत्न सुरु असल्याचे असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
रोहित पवार यांचे फेसबुकवर 537k फॉलोअर्स आहेत. त्यांच्या अकाऊंटचा प्रोफाइल फोटो आणि कव्हर फोटो वगळता, एक मेसेजही पोस्ट करण्यात आला आहे. रोहित पवार यांनीच या पेजचे नाव रि-ब्रँडिंगच्या हेतुने बदलले असल्याचाही एक मेसेज पोस्ट करण्यात आला आहे. परंतु. रोहित पवारांनी ट्विटरवर हे हॅकरचे काम असल्याचे म्हटले आहे.
--
महत्त्वाची बाब म्हणजे, रोहित पवार यांच्या फेसबुक पेजचे युरआरएलही बदलण्यात आले असून ते, /SiyaRajput.Real असे दिसत आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन सिया राजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यात आल्याचे दिसतेय. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन लागोपाठ तीन ते चार पोस्ट केल्याचे दिसतेय. पण पेज नेमके कुठून आणि कुणी हॅक केले आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.