जाणता राजा या उपाधीबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:02 PM2020-01-15T16:02:29+5:302020-01-15T16:27:35+5:30

जाणता राजा या उपाधीवरून वाद निर्माण झाला असताना शरद पवार यांनी आज प्रथमच मोठे विधान केले आहे

Sharad Pawar made a big statement about the Janata Raja | जाणता राजा या उपाधीबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले....

जाणता राजा या उपाधीबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले....

googlenewsNext

सातारा - छत्रपती शिवाजी महाराज यांची वर्तमान काळातील नेत्यांशी करण्यात येणाऱ्या तुलनेवरून सध्या राज्यातील राजकारण पेटले आहे. एकीकडे 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'  या पुस्तकावरून वादाला तोंड फुटलेले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेल्या जाणता राजा या उपाधीवर शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्यासह काही जणांना आक्षेप घेतला आहे. दरम्यान, हा वाद निर्माण झाला असताना शरद पवार यांनी जाणता राजा या उपाधीबाबत प्रथमच मोठे विधान केले आहे. 

सातारा येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, मला जाणता राजा म्हणा, असे मी कधीही म्हटलेले नाही. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जाणता राजा हा शब्द रामदास स्वामी यांनी पहिल्यांदा वापरला. रामदास स्वामी हे काही शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरू होत्या. मात्र, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते असे लेखणीतून प्रचलित केले गेले. छत्रपती ही शिवाजी महाराजांसाठी वापरण्यात येणारी खरी उपाधी आहे.''

जाणता राजा फक्त शिवाजी महाराज; उदयनराजेंची पवारांवर टीका

शरद पवार- देशाचे, राज्याचे राजकारण व्यापलेला ‘जाणता राजा’!

Exclusive: ...म्हणून शरद पवार हे जाणते राजेच; संजय राऊत यांनी केला गुणगौरव  

दरम्यान, शरद पवार हे जाणते राजे असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  ''शरद पवार हे निश्चितपणे जाणते राजे आहेत. जनतेने त्यांना ही उपाधी दिली आहे. तशीच महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेनं त्यांना राजा मानलं. लूटमार करणारा राजा होत नाही, रक्षण करणारा राजा असतो. शिवरायांवर कुणाचाही मालकी हक्क असू शकत नाही. जो या महाराष्ट्रात आणि देशात समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करतो, तो जाणता राजा असतो. त्यामुळे कुणीही त्यावर कुणी आक्षेप घ्यायची गरज नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

त्यापूर्वी, जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार हे जाणते राजे असल्याचे म्हणते होते. होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न, प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेत, असे आव्हाड म्हणाले होते. 

Web Title: Sharad Pawar made a big statement about the Janata Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.