शरद पवार म्हणजे टाइमपास - ३ - उद्धव ठाकरेंचा टोला

By Admin | Published: May 6, 2015 08:47 AM2015-05-06T08:47:08+5:302015-05-06T08:47:08+5:30

‘टाइमपास-३’ काढायचा असेल तर निर्माता दिग्दर्शकांनी पवारांशी चर्चा करायला हवी. उत्तम संहिता मिळेल. बाकी पवारांच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता ‘चला, हवा येऊ द्या

Sharad Pawar means timepass - 3 - Uddhav Thackeray Tola | शरद पवार म्हणजे टाइमपास - ३ - उद्धव ठाकरेंचा टोला

शरद पवार म्हणजे टाइमपास - ३ - उद्धव ठाकरेंचा टोला

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई दि. ६ - ‘टाइमपास-३’ काढायचा असेल तर निर्माता दिग्दर्शकांनी पवारांशी चर्चा करायला हवी. उत्तम संहिता मिळेल. बाकी पवारांच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता ‘चला, हवा येऊ द्या’ असे बोलून कामाला लागूया, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सरकार युती फुटेल असं भाकित करणा-या पवारांचा राजकारणात त्यांचा अनुभव दांडगा असला तरी सध्याच्या परिस्थितीत ‘नया है वह!’ अशी त्यांची अवस्था झाली आहे, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अग्रलेखातली महत्त्वाची टिप्पणी:
- जुनेजाणते व अनुभवी नेते शरद पवार यांच्याविषयी आम्ही पामरांनी काय सांगावे! राजकारणातील ते एक ज्ञानदेवच आहेत. ज्ञानोबा माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले असे म्हणतात, पण या आधुनिक ज्ञानदेवांच्या पक्षात बैल व रेडे उरले नसल्याने ते स्वत:च लोकांना उपदेशाचे डोस पाजत असतात. ज्ञानदेवांनी भिंत चालवून दाखवली, तर शरद माऊली हे तोंडाची टकळी चालवून राजकारण हलवीत असतात. पण शेवटी त्यांची ज्येष्ठता वगैरे लक्षात घेता बरेच लोक कानात कापसाचे बोळे कोंबूनच त्यांची रसाळ प्रवचने ऐकत असतात.
- शेवटी शिवसेना-भाजपचेच सरकार महाराष्ट्रात आल्याने पवारांसह अनेकांचा तपोभंग झाला. स्थिरतेच्या नावाखाली बाहेरून पाठिंबा द्यायचा व सरकार अस्थिर ठेवून राज्य चालवायचे या राजकारणातील खेळ्या महाराष्ट्रात कालपर्यंत चालल्या असतीलही, पण यापुढे चालणार नाहीत. पवारांनी राजकारणात हयात घालवली, पण शेवटी पदरी काय पडले?
उमरभर जिंदा रहा,
मगर जिंदगी देखी नही...
या उमर खय्यामच्या काव्याप्रमाणेच त्यांचे झाले. सारी उमर राजकारणात घालवली, पण इतरांना टपल्या व टिचक्या मारण्याशिवाय काय केले?
- नवी मुंबईत त्यांच्या पक्षाला यश मिळाले त्यात त्यांचे कर्तृत्व नाही. भारतीय जनता पक्षाची कामगिरी सुमार झाल्याचा फायदा त्यांना मिळाला. पवार नवी मुंबईत प्रचारास गेले नाहीत. पवार तेथे गेले असते तर ‘राष्ट्रवादी’च्या जागा नक्कीच कमी झाल्या असत्या.
- पवारांना सध्या विशेष काम नसल्याने ‘टाइमपास’ चालला आहे. ‘टाइमपास-२’ नावाचा मराठी सिनेमा सध्या जोरात चालला आहे. ‘टाइमपास-३’मध्ये दगडू कोण, पराजू कोण हे जनतेलाच ठरवू द्या. बाकी पवारांच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता ‘चला, हवा येऊ द्या’ असे बोलून कामाला लागूया. राजकारणात त्यांचा अनुभव दांडगा असला तरी सध्याच्या परिस्थितीत ‘नया है वह!’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. ‘टाइमपास-३’ हिट होईल. चला, कामाला लागा!

Web Title: Sharad Pawar means timepass - 3 - Uddhav Thackeray Tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.