शरद पवार, राज ठाकरेंच्या विमान प्रवासाची चर्चा, आघाडीत आता मनसेही?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:08 AM2018-10-26T04:08:47+5:302018-10-26T04:11:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना ऊत आला आहे.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना ऊत आला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे वृत्त होते. राज गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. त्यानंतर चिकलठाणा विमानतळावरून सायंकाळी ६ वाजता मुंबईकडे रवाना झाले. याच विमानातून पवार हेदेखील रवाना झाले. याची माहिती मिळताच चर्चा सुरू झाली. विमान प्रवासात या दोघांच्यात काय गुप्तगू झाले, याची ठोस माहिती समजली नाही. परंतु मनसेकडून ज्या मतदारसंघात २५ हजारांपेक्षा जास्त मतदान मिळाले, अशा ४० जागांवर विधानसभा निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे समजते.