शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, नागपूरहून गडचिरोलीला जातानाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:31 AM2017-11-16T02:31:37+5:302017-11-16T04:48:46+5:30

नागपूरहून गडचिरोलीला जात असताना उमरेडसमोर कारला अपघात झाल्याचे दिसताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्वरित अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.

Sharad Pawar ran to help the victims | शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, नागपूरहून गडचिरोलीला जातानाची घटना

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, नागपूरहून गडचिरोलीला जातानाची घटना

Next

नागपूर : नागपूरहून गडचिरोलीला जात असताना उमरेडसमोर कारला अपघात झाल्याचे दिसताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्वरित अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. चेंदामेंदा झालेल्या कारचे दरवाजे सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्यांनी तोडले व जखमींना रुग्णालयात रवाना केले. पवार तब्बल २० मिनिटे अपघातस्थळी थांबून होते.
पवार यांना ताफा सकाळी १०च्या सुमारास नागपूर विमानतळावरून निघाला. ११.०५ वाजता उमरेडच्या पुढे भिवापूरजवळ नागपूरकडे येणारी कार अपघातग्रस्त झाल्याचे त्यांना दिसले. गाडीला अर्ध्या मिनिटापूर्वीच अपघात झाला होता. रस्त्यावरून जात असलेल्या एका टिप्परला या कारने मागून धडक दिली होती व कारला मागून भरधाव येणाºया दुसºया टप्परने चिरडले होते. यात कारचा दोन्ही बाजूने चेंदामेंदा झाला होता. अपघातग्रस्त कारमध्ये गडचिरोली येथील अमित रामविलास यादव यांच्यासह त्यांचे वडील, पत्नी, आई जखमी अवस्थेत अडकले होते.
अपघात पाहून पवार यांनी ताफा थांबविला. त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख होते. पवार गाडीतून उतरले व थेट अपघातग्रस्त कारजवळ गेले. अपघातग्रस्त कार लॉक झाली होती. पवार यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने कारचे दार तोडले व जखमींना बाहेर काढले. त्यांची विचारपूस केली. घटनास्थळी अ‍ॅम्ब्युलन्स येऊन जखमींना घेऊन जाईपर्यंत ते २० मिनिटे थांबून होते. यानंतर पवार गडचिरोलीसाठी रवाना झाले.

Web Title: Sharad Pawar ran to help the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.