"शरद पवारांना देव आठवले", लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर भाजपने घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 06:04 PM2024-09-09T18:04:56+5:302024-09-09T18:06:07+5:30
Sharad Pawar Lalbaugcha Raja : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या दर्शनानंतर भाजपने पवारांना निशाणा साधला.
Sharad Pawar BJP : 'शरद पवारांना देव आठवले, चाळीस वर्षांत असे पहिल्यांदाच घडले आहे', असे म्हणत भाजप शरद पवारांवर टीकेचे बाण डागले. मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचे शरद पवारांनी सोमवारी (९ सप्टेंबर) दर्शन घेतले. शरद पवारांचे फोटो पोस्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना लक्ष्य केले.
"भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला. आपल्या बहुआयामी विकासामुळे, FDI मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. पण, महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे", असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना लक्ष्य केले.
भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 9, 2024
आपल्या बहुआयामी विकासामुळे, FDI मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे.
पण महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे. शरद पवारांना देव… pic.twitter.com/eTRssRJbhR
"शरद पवारांना देव आठवले. महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षांत पहिल्यांदा असे घडले... याला राजकीय पोळी भाजणे म्हणतात", अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर शरद पवारांच्या गणपती दर्शनावर काय बोलले?
"चाळीस वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते. आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ३० वर्षांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला शरद पवार आले आहेत. मला वाटतं की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना, आता रायगडाची, लालबागच्या राजाची आठवण पवारांना आली आहे", असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा आहे.
एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे. pic.twitter.com/yrIg1gavzV— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 9, 2024
"मी लालबागचा राजाला प्रार्थना करतो की, यांना हिंदुत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देवो. परंतु, ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवारांसमोर प्रभू रामचंद्रांचा, विठुरायाचा, हिंदुत्वाचा अपमान केला. त्यावर काही न बोलता, दुसऱ्या दिवशी लालबागचा राजाच्या दर्शनाला जायचे. मला वाटतं की, हे निवडणुकीच्या दृष्टीने का होईना नौटंकी का होईना, लालबागचा राजाने यांना सुबुद्धी दिलेली आहे. महाराष्ट्रातील यांचे हे ढोंगी प्रेम, ढोंगी श्रद्धा समजून येतात", असे प्रवीण दरेकर म्हणाले.