सर्व शेतीमालाला हमी भाव द्यायला हवा - शरद पवार
By admin | Published: October 28, 2016 01:13 AM2016-10-28T01:13:33+5:302016-10-28T01:13:33+5:30
देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे़ त्यामुळे उसालाच नव्हे तर प्रत्येक कृषिमालाला हमीभाव मिळाला पाहिजे़ हमीभाव मिळाला तरच शेतकऱ्यांची
उस्मानाबाद : देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे़ त्यामुळे उसालाच नव्हे तर प्रत्येक कृषिमालाला हमीभाव मिळाला पाहिजे़ हमीभाव मिळाला तरच शेतकऱ्यांची आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था बदलेल, असा विश्वास माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी व्यक्त केला़
येथे आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते़ शासन एकीकडे उसाला ३२०० रूपये भाव द्या, असे सांगते तर दुसरीकडे साखर निर्यातीवर बंदी, साखर विक्रीसाठी केलेली कालावधीची सक्ती अशी धोरणे आखते. त्यामुळेच कारखानदारी अडचणीत आल्याची टीका त्यांनी केली.
व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती हरिभाऊ बागडे, माजी मंत्री शशिकांत सुतार व अन्य मान्यवर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)