पढवणं हीच बारामतीची परंपरा : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:44 PM2019-03-11T15:44:07+5:302019-03-11T15:46:52+5:30

राज ठाकरेंचे भाषण बारामतीवरून पढवलेले होते असा आरोप केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. पढवणं ही बारामतीची परंपरा आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

Sharad Pawar strikes on CM Devendra Fadnavis on issue of Raj Thackeray | पढवणं हीच बारामतीची परंपरा : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर 

पढवणं हीच बारामतीची परंपरा : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर 

Next

पुणे : राज ठाकरेंचे भाषण बारामतीवरून पढवलेले होते असा आरोप केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. पढवणं ही बारामतीची परंपरा आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

             महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने केलेल्या ठाकरे यांच्या भाषणावरून मुख्यमंत्री  फडणवीस यांनी चांगलीच टीका केली होती. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते की, राज ठाकरे म्हणजे बारामतीचा पोपटच असून, त्यांच्या भाषणांच्या स्क्रिप्ट या बारामतीहून येतात.ते  भाषणाची सुपारी घेतात, त्यांच्या भाषणाने विचलित होऊ नका असा दिलासाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मी ठाकरे यांना पढवल्याचं म्हटलं हे ठीक आहे. असही बारामतीची ही परंपरा पेशवे काळापासून असून मोरोपंत बारामतीचे होते अशी आठवणही त्यांनी करून दिली. 

या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, 

  • मी माढ्यातुन निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण् पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही.
  •  आम्ही कुटुंबात बसून चर्चा केली. मी स्वत: उभं न राहता नव्या पिढीला संधी द्यायचं ठरवलं. पार्थला उमेदवारी द्यावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एका घरातील किती उमेदवार द्यायचे असा प्रश्र्न होता.त्यामुळे मी पार्थला संधी द्यायचं  ठरवलं.
  •  मी आतापर्यंत चौदा निवडणूका लढलोय. काहींनी बातमी चालवली की मी माघार घेतली. चौदा निवडणूकांमधे मी माघार घेतलेली नाही.
  •   नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघात सहापैकी दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. आम्हीच या मतदारसंघातुन बाळासाहेब विखे-पाटील यांचा पराभव केला होता. विखे-पाटील भाजपमध्ये जातील असं वाटतं नाही. त्यांच्या कॉंग्रेस निष्ठेबद्दल माझ्या मनात शंका नाही.
  •  महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होतेय. त्यामुळे आम्हाला प्रचाराला वेळ मिळेल.

Web Title: Sharad Pawar strikes on CM Devendra Fadnavis on issue of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.