शरद पवारांनी दिल्या नेत्यांना कानपिचक्या

By admin | Published: January 14, 2016 12:33 AM2016-01-14T00:33:13+5:302016-01-14T00:33:13+5:30

जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करण्यात पक्षामध्ये सातत्य दिसत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करीत पक्ष कार्यालयात जा, लोकांमध्ये मिसळा आणि सरकारच्या विरोधात सतत आंदोलनं करा, अशा

Sharad Pawar told the leaders | शरद पवारांनी दिल्या नेत्यांना कानपिचक्या

शरद पवारांनी दिल्या नेत्यांना कानपिचक्या

Next

मुंबई : जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करण्यात पक्षामध्ये सातत्य दिसत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करीत पक्ष कार्यालयात जा, लोकांमध्ये मिसळा आणि सरकारच्या विरोधात सतत आंदोलनं करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्याचे समजते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बुधवारी राष्ट्रवादीच्या निवडक ३० नेत्यांसमवेत पवार यांनी बैठक घेतली. माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते.
सूत्रांनी सांगितले की सरकारविरोधात आणि जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलन करण्याबाबत पक्षात सातत्य नसल्याची भावना पवार यांनी बोलून दाखविली. अनेक ठिकाणी पक्षाची कार्यालये आहेत, पण तेथे येऊन बसले पाहिजे. कार्यालय रोज उघडते की नाही, हे पाहिले पाहिजे. कार्यकर्त्यांशी नाळ कायम ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिला. त्यामुळेच की काय, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्ष तीव्र लढा उभारेल, असे तटकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

लाड यांच्या उमेदवारीने विश्वासार्हतेला धक्का...
विधान परिषद निवडणुकीत मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या उमेदवारीला पक्षातील काही नेत्यांचे समर्थन असल्याचे चित्र निर्माण झाले आणि त्याचा फटका सोलापूर आणि अकोल्यात राष्ट्रवादीला बसला. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने आम्हाला त्यामुळेच साथ दिली नाही, असे पवार म्हणाल्याचे समजते. आगामी काळात विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी निवडणूक होईल तेव्हा काँग्रेसबरोबर आघाडी करा, असा सल्लाही पवार यांनी दिला.

पक्ष भुजबळांच्या पाठीशी : छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्येच आहेत आणि राहतील. ते पक्षाचे आदरणीय नेते असून, अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्यांच्यावर होत असलेले आरोप राजकीय स्वरूपाचे आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी पूर्णत: उभा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

Web Title: Sharad Pawar told the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.